Saturday, December 21, 2024
Homeअर्थविषयकरेडी रेडकनरचे दर वाढणार? पाच टक्क्यांनी अपेक्षित, पुढील आठवड्यात नगररचना विभागाची बैठक

रेडी रेडकनरचे दर वाढणार? पाच टक्क्यांनी अपेक्षित, पुढील आठवड्यात नगररचना विभागाची बैठक

अकोला दिव्य न्युज ब्युरो : गेल्या वर्षी राज्यातील रेडीरेकनरचे दर जैसे थे होते. तसेच गेल्या वर्षभरात घरे, जागांच्या खरेदी विक्रीचे व्यवहार मोठ्या प्रमाणात झाले आहेत. त्यामुळे सन २०२४-२५ या वर्षासाठीचे रेडीरेकनरचे दर पाच टक्क्यांनी वाढविण्याचा प्रस्ताव नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून सरकारला पाठविण्याची शक्यता व्यक्त आहे. या संदर्भात पुढील आठवड्यात बैठक होणार आहे.

राज्यात काही वर्षांपूर्वी करोनाचे संकट, त्यामुळे आर्थिक स्थिती खालावलेली होती. यामुळे रेडीरेकनरचे दर वाढविण्यात आले नव्हते. यंदा रेडीरेकनरच्या दरवाढीबाबत विचारविनिमय सुरू करण्यात आला आहे. त्याबाबत जानेवारी महिन्यात जिल्हाधिकारी कार्यालयात नोंदणी मुद्रांक शुल्क तसेच नगररचना विभागाने लोकप्रतिनिधींची बैठक बोलाविली होती. त्या बैठकीला लोकप्रतिनिधींनी पाठ फिरविली होती. त्यानंतर त्यांची मते जाणून घेण्यात येणार असल्याचे नोंदणी मुद्रांक तसेच नगररचना विभागाने स्पष्ट केले होते. त्यामुळे यंदा वाढ होणार का याबाबत उत्सुकता लागून आहे.

राज्यात नोंदणी व मुद्रांक महानिरीक्षकांकडून दरवर्षी १ एप्रिलपासून रेडीरेकनरचे नवे दर जाहीर करण्यात येतात. पुढील आठवड्यात नगररचना विभागातील उपसंचालक व सहाय्यक संचालकांची तीन दिवसांची बैठक नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने आयोजित केली आहे. या बैठकीत हे दर अंतिम होण्याची शक्यता आहे. हा प्रस्ताव राज्य सरकारला सादर करून त्यावर शिक्कामोर्तब केला जाईल. त्यानंतर एक एप्रिलला अधिकृत घोषणा होऊ शकते, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

दस्तनोंदणीत वाढ
गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा ११ महिन्यांमध्ये दस्तनोंदणीत वाढ झाली आहे. ११ महिन्यांत राज्याला ४२ हजार कोटींचा महसूल मिळाला आहे. खरेदी विक्रीच्या व्यवहारांत वाढ झाल्याचे त्यावरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे यंदा त्यात वाढ झाल्यास जागांना योग्य मोबदला मिळेल, अशी अपेक्षा आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!