अकोला दिव्य न्युज ब्युरो : जवळपास 50 रक्तदात्यांनी रक्तदान करुन संत रविदास यांना जयंतीनिमित्त. आगळीवेगळी आदरांजली वाहिली.गुरू रविदास चर्मकार महासंघातर्फे संत रविदास यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लक्ष्मण घुमरे होते. डॉ अभय पाटील यांनी शिबीराचे औपचारिक उद्घाटन केले.कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून डॉ गणेश बोरकर, संग्राम गावंडे, नितीन ताकवाले,पंकज गावंडे, सुधीर काहकर, राजकुमार नाचणे, प्रकाश ठोंबरे, काशीनाथ डांगे व दिलीप देशमुख उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संत रविदास, छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.
आज महापुरुषांच्या संदेशाची खऱ्या अर्थाने गरज आहे, जाती पाती संपल्या पाहिजे, विवेकांनी त्यांचा विवेक जागृत करून देशाची परिस्थिती समजून घेतली पाहिजे व देशाच्या भविष्याकरीता योगदान देणे काळजी गरज आहे. असे प्रतिपादन डॉ. अभय पाटील यांनी शिबीराचे उद्घाटन करताना केले. त्यानंतर लक्षण घुमरे, डॉ अभय पाटील व पाहुण्यांच्या हस्ते रक्तदान शिबीराचे उद्घाटन करण्यात आले होते. डॉ. गणेश बोरकर, नितीन ताकवाले यांनी संत रविदास महाराज यांचे कार्य सांगून मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष लक्ष्मणदादा घुमरे यांनी सांगितले की, संत रविदास महाराज यांच्या काळात काय परिस्थिती होती व आज काय परिस्तिथी आहे, याबाबत तरुणांनी जागृत राहिले पाहिजे.
कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अरविंद घोपे महानगर अध्यक्ष, गोपाल बसेरे , पुंडलिक गणगे , रोशन इंगळे, सुरेश वाडेकर, संतोष वाघमारे, निलेश ढाकरे, नाजुकराव डांगे, दादाराव वानखडे मायाताई डामरे, अनिता वाडेकर ॲड ममता तिवारी व त्यांच्या सहकाऱ्यांनी कार्य केले. कार्यक्रमाचे संचालन प्रशांत भटकर यांनी तर आभार प्रदर्शन अँड.शेषराव गव्हाळे यांनी केले.