Friday, January 3, 2025
Homeसामाजिकअवघ्या साडेपाच वर्षाचा ईशान सौरभ सारडाला राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत उपविजेतेपद !

अवघ्या साडेपाच वर्षाचा ईशान सौरभ सारडाला राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत उपविजेतेपद !

अकोला दिव्य न्युज ब्युरो : राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत सहभागी जवळपास ३०० स्पर्धकांमध्ये ७ वर्ष वयोगटात शानदार खेळाचे प्रदर्शन करीत अवघ्या साडे पाच वर्षांच्या ईशान सौरभ सारडा हा उपविजेता ठरला. त्याच्या या घवघवीत यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

शेगांव येथे महाविद्यालय व बुलढाणा जिल्हा बुद्धिबळ संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने शेगाव येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत अकोला, अमरावती, बुलडाणा नागपूर समवेत राज्यभरातील तब्बल ३०० स्पर्धकांनी सहभाग घेतला. या स्पर्धेत अकोला, अमरावती, बुलडाणा नागपूर समवेत राज्यभरातील स्पर्धकांनी सहभाग नोदविला. ही स्पर्धा स्विस लीग पद्धतीने ८ फेऱ्यात घेण्यात आली. ईशान सारडा याने ७ वर्ष वयोगटात ४ स्पर्धकांचा पराभव करीत उपविजेतेपदावर आपले नाव कोरले.

ईशान सारडा हा निशू नर्सरी कोठारी कॉन्व्हेन्टचा विद्यार्थी असून . पारितोषिक वितरण प्रसंगी बुद्धिबळ प्रशिक्षक बाळासाहेब बोदडे, प्राचार्य महेश हरणे, महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ संघटनेचे सहसचिव अंकुश रक्ताडे उपस्थित होते. या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी चिन्मय हरणे, देवेंद्र शेगोकर व आंतरराष्ट्रीय पंच प्रवीण ठाकरे जळगाव व नागपूरचे आंतरराट्रीय पंच दीपक चव्हाण यांनी काम पाहिले.

अकोला माहेश्वरी समाजातील प्रतिष्ठित नागरिक व व्यावसायिक सतिश सारडा यांचा ईशान हा नातू असून ख्यातनाम विधीज्ञ सौरभ सारडा यांचा मुलगा आहे. ईशानला बुध्दिबळाचे प्रशिक्षण प्रविण हेंड देत असून, वयाच्या अवघ्या साडेपाच वर्षांत त्याने मिळवलेल्या यशाने त्यांच्या बुद्धीची चुणूक दाखवून दिले आहे, असे हेंड यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!