Thursday, January 2, 2025
Homeराजकारणभाजपा कार्यकर्त्यांनी आयपीएस अधिकाऱ्याला खलिस्तानी संबोधलं ?

भाजपा कार्यकर्त्यांनी आयपीएस अधिकाऱ्याला खलिस्तानी संबोधलं ?

अकोला दिव्य न्युज ब्यूरो : पश्चिम बंगालच्या उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील संदेशखालीमध्ये परिस्थिती अधिक तणावपूर्ण बनली आहे. संदेशखाली येथील महिलांवरील लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणाविरोधात विरोधी पक्ष भारतीय जनता पक्ष पूर्णपणे रस्त्यावर उतरला आहे. मंगळवारी (२० फेब्रुवारी) भाजपाचे अनेक आमदार संदेशखालीमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होते. परंतु त्यांना आयपीएस अधिकारी जसप्रीत सिंग यांनी रोखले. यावेळी भाजपा आमदार आणि पोलिस अधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी आयपीएस अधिकाऱ्यांना खलिस्तानी संबोधले. त्यामुळे येथील परिस्थिती अधिक चिघळली. एबीपीने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर व्हिडिओ शेअर करताना काँग्रेसने म्हटलं की, “भाजपाच्या लोकांचे निकृष्ट वर्तन पहा. दिवस- रात्री देशाची सेवा करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला पगडी घातल्यामुळे त्याला खलिस्तानी संबोधण्यात आले, ही अत्यंत निकृष्ट मानसिकता आहे.या व्हिडिओमध्ये आयपीएस अधिकारी जसप्रीत सिंह दिसत आहेत. ते म्हणतात की, ‘मी पगडी घातल्यामुळे तुम्ही मला खलिस्तानी म्हणत आहात. तुमची हिम्मत आहे का? पोलिसाने पगडी घालून ड्युटी केली तर तो खलिस्तानी होतो का? ही तुमची पातळी आहे का?’

या व्हिडिओमध्ये आयपीएस अधिकारी जसप्रीत सिंह दिसत आहेत. ते म्हणतात की, ‘मी पगडी घातल्यामुळे तुम्ही मला खलिस्तानी म्हणत आहात. तुमची हिम्मत आहे का? पोलिसाने पगडी घालून ड्युटी केली तर तो खलिस्तानी होतो का? ही तुमची पातळी आहे का?’

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!