Thursday, December 26, 2024
Homeक्रीडा48 व्या ज्युनीयर राष्ट्रीय कॅरम स्पर्धेत प्रभातच्या आयुष टेकामची बाजी

48 व्या ज्युनीयर राष्ट्रीय कॅरम स्पर्धेत प्रभातच्या आयुष टेकामची बाजी

अकोला दिव्य न्युज ब्युरो : इनडोअर खेळांमध्ये कॅरम हा सर्वात प्रसिद्ध आणि अनेकांच्या आवडीचा खेळ. या खेळाच्या नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत विदर्भाच्या मुलांनी दमदार कामगिरी करत कांस्य पदक पटकाविले. तामिळनाडूच्या एसआरएम मदुराई कॉलेज फॉर इंजिनिरींग व टेक्नोलॉजी मदुराई येथे झालेल्या 48 वी ज्युनीयर राष्ट्रीय कॅरम स्पर्धेत प्रभातच्या आयुष टेकामसह विदर्भाच्या मुलांनी यश प्राप्त केले आहे.
या राष्ट्रीय कॅरम स्पर्धेचे आयोजन एसआरएम मदुराई कॉलेज फॉर इंजिनिरींग व टेक्नोलॉजी मदुराई, तामिळनाडू येथे करण्यात आले होते. 48 व्या ज्युनीयर राष्ट्रीय कॅरम स्पर्धेत विदर्भ संघाकडून प्रभात किड्स स्कूलचा आयुष टेकाम व आपल्या 4 साथीदारांसह या स्पर्धेत उत्कृष्ट यश संपादीत केल्याने कांस्य पदक पटकाविले.
आयुष टेकामला प्रभातचे कॅरम प्रशिक्षक तन्वीर खान यांचे मार्गदर्शन लाभले. प्रभातचे संचालक डॉ. गजानन नारे, संचालिका सौ. वंदना नारे, सचिव निरज आवंडेकर, प्राचार्य वृषाली वाघमारे, उपप्राचार्य अर्चना बेलसरे, क्रीडा विभाग प्रमुख संतोष लोमटे यांच्यासह शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी आयुषचे कौतुक केले असून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!