Thursday, December 26, 2024
Homeगुन्हेगारीअकोल्यात शाळेच्या छतावर एक अर्भक व काही अवशेष आढळले ! संशयाची सुई...

अकोल्यात शाळेच्या छतावर एक अर्भक व काही अवशेष आढळले ! संशयाची सुई लेडी हॉर्डिंगकडे ?

अकोला दिव्य न्युज ब्युरो : जिल्हा परिषद अध्यक्षांच्या शासकीय निवासस्थानासमोरच असलेल्या, अडगळीत पडलेल्या जिल्हा परिषद उर्दू माध्यमिक विद्यालयाच्या गच्चीवर अर्भक आणि काही मांसाचे अवशेष आढळून आल्याने या परिसरात एकच खळबळ उडाली. पोलीसांनी घटनेची दखल घेवून परिसरातील सीसीटिव्ही कॅमेरे तपासणी सुरु केली असून आढळलेले अर्भक व काही मासाचे तुकडे वैद्यकिय तपासणी करीता पाठविण्यात आले आहे. अहवाल आल्यानंतर याबाबत अधिक माहिती मिळू शकेल,असे सुत्रांनी म्हंटले आहे. या प्रकरणी संशयाची सुई जवळचं असलेल्या लेडी हॉर्डिंग हॉस्पिटलकडे वळत आहे.

शहरातील रतनलाल प्लॉट मार्गावर असलेल्या जिल्हा परिषद उर्दू माध्यमिक विद्यालयाच्या आवारात आज रविवार ११ फेब्रुवारीला दुपारच्या सुमारास काही तरुण क्रिकेट खेळताना, एका फलंदाजाने मारलेल्या फटक्याने चेंडू शाळेच्या गच्चीवर गेला आणि ही घटना उघडकीस आली. शाळेच्या गच्चीवर चार अर्भक सापडल्या वार्ता शहरात वा-यासारखी पसरल्याने खळबळ माजली.यावेळी शाळेच्या आवारात मोठ्या संख्येने बघ्यांची गर्दी झाली होती.

पोलिसांना घटनेची माहिती मिळताच अकोला शहराचे उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी, सिव्हिल लाईनचे एसएचओ व सर्व उच्चपदस्थ अधिकारी व एलसीबीचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. मात्र पोलिसांनी तपासणी केली असता एकच अर्भक होते. इतर अवशेष असल्याचे समोर आले.गर्भलिंगनिदान झाल्यानंतर गर्भपात करण्यात आल्याचे स्पष्ट होते. हाकेच्या अंतरावर शासकीय महिला रुग्णालय असून, आज या ठिकाणी पालकमंत्र्यांचा शासकीय कार्यक्रम असल्याने काल रात्रीपासून रुग्णालयात युध्दपातळीवर साफसफाई केली जात होती. या दरम्यान अर्भकाची व अवशेषाची विल्हेवाट लावली असावी, अशा संशय व्यक्त केला जात आहे. रुग्णालय प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

या घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी होत असून पोलिसांनी पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, या शाळेसाठी वॉचमन नेमण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. मात्र जिल्हा परिषद प्रशासनाचे देखील दुर्लक्ष आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!