अकोला दिव्य न्युज ब्युरो : पृथ्वी,जल,अग्नी,वायू आणि आकाश या प्रकृतीच्या पाच तत्वांसोबत असलेल्या संबंधांचा विसर पडल्याने प्रत्येकाला विसर पडल्याने, अनेकजण विविध प्रकारच्या आजारांनी ग्रस्त होत आहे.मात्र या पाच तत्वांच्या माध्यमातून मन व शरीर शुद्ध व सुदृढ केल्या जाऊ शकते. आरोग्याविषयी जागरूक व्यक्तींनी निरोगी जीवनशैलीसाठी योगासह नैसर्गिक उपचारपद्धतीचा अंगीकार करावा, असे प्रतिपादन लाइफ केअर अँड पीस मिशनने स्थापन केलेल्या निर्वाण नॅचरोपॅथी सेंटर येथील गुरु मां यांनी केले. अकोला शहरात पहिल्यांदा आयोजित दोन दिवसीय निःशुल्क पंचतत्व साधना कार्यशाळेच्या आज पहिल्या सत्रात त्या बोलत होत्या.
मारवाडी प्रेस गणेशोत्सव मंडळ, श्रीमती पुष्पादेवी ओमप्रकाश अग्रवाल, अग्रवाल महिला मंडळ, रवीना तरण खत्री व खत्री महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने माहेश्वरी भवन येथे कार्यशाळाचे आयोजन करण्यात आले आहे. आज कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी पंचतत्व प्रणालीने शारीरिक स्वास्थ व तणाव, आहार, विहार इत्यादी नियंत्रण ठेवणे कसे शक्य आहे, याची सरळ सोपी वैज्ञानिक पद्धत गुरु मां यांनी प्रात्यक्षिकांसह सांगितली.
कार्यशाळेच्या प्रारंभी इगतपुरी येथील प्रख्यात या संस्थेच्या गुरु मां यांचा पुष्पादेवी सोनालावाला, निता अग्रवाल, शरद चांडक, ब्रजेश तापडिया, शैलेंद्र कागलीवाल, रविणा खत्री, संतोष केडीया, अनीता मुरारका व सुषमा दीदी पारदासानी यांनी शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गुरु मां यांचे स्वागत केले.
जनता बॅकचे माजी अध्यक्ष रमाकांत खेतान, डॉ. गजानन नारे, अनिल राठी, वरिष्ठ पत्रकार व संपादक गजानन सोमाणी, कमल अग्रवाल,पंकज जाजु, संतोष अग्रवाल, अरविंद अग्रवाल सोनालावाला, सौ शोभा गोयनका, श्रीमती शोभा गोयनका, राजेश अग्रवाल, डॉ अरुण राठी, पंकज कोठारी, गोंविद बजाज, केशव खटोड, राजीव बजाज, विजय राठी, सुरेश राठी, कमल जाजु, डॉ दीलीप अग्रवाल, अनिल सोनी, सरला तापडीया, तृप्ती हेडा, शिला चांडक, शितल चांडक, सुनिता अग्रवाल, वेणु तापडीया, रितेश चौधरी, धिरज अग्रवाल,तरण खत्री, नितीन गोयनका, अशोक भुतडा, सचिन चांडक,अशोक अग्रवाल, सचिन अग्रवाल, संध्या अग्रवाल, निर्मला अग्रवाल, संतोष मालानी, दीपक बजाज यांच्यासह ५०० च्यावर महिला व पुरूष यांनी लाभ घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शारदा बियाणी यांनी केले. उद्या शनिवार हा कार्यशाळेचा शेवटचा दिवस असून, इच्छुकांनी सकाळी ८ वाजता पुर्वी येऊन आपल्या जागेवर स्थानापन्न व्हावे. यामुळे कोणालाही असुविधा होणार नाही. कार्यशाळा ठीक वेळेवरच सुरू होईल.अशी माहिती आयोजकांनी दिली आहे.