अकोला दिव्य न्युज ब्युरो : आरोग्याविषयी जागरूक व्यक्तींना निरोगी जीवनशैली प्रदान करण्यासाठी आणि योगासह नैसर्गिक उपचारांद्वारे त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी लाइफ केअर अँड पीस मिशनने स्थापन केलेल्या निर्वाण नॅचरोपॅथी अँड रिट्रीट सेंटर (निर्वाण नॅचरोपॅथी सेंटर) हे महाराष्ट्रातील निसर्गोपचार केंद्रांपैकी एक असून या ठिकाणी पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश या प्रकृतीच्या पंचतत्वाच्या साधनेच्या माध्यमातून व्यक्तींना शुद्ध शक्तिशाली व सुदृढ केल्या जाते. ही एक योगीक प्रक्रिया असून या प्रक्रियेच्या माहितीसाठी इगतपुरी येथील या प्रख्यात संस्थेच्या गुरु माँ यांचे अकोला शहरात पंचतत्व साधना कार्यशाळेचे निःशुल्क आयोजन करण्यात आले आहे.
मारवाडी प्रेस गणेशोत्सव मंडळ आणि श्रीमती पुष्पादेवी ओमप्रकाश अग्रवाल, अग्रवाल महिला मंडळ, रवीना तरण खत्री व खत्री महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार ९ व शनिवार १० फेब्रुवारी रोजी सकाळी ८ ते १० वाजेपर्यंत माहेश्वरी भवन, न्यू राधाकिसन प्लॉट येथे या मोफत कार्यशाळाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत पंचतत्व प्रणालीने शारीरिक स्वास्थ व तणाव, आहार, विहार इत्यादी कसे नियंत्रण ठेवणे कसे शक्य आहे, याची सरळ सोपी वैज्ञानिक पद्धत गुरु मां प्रात्यक्षिकांसह सांगतीलं
दोन दिवसीय मोफत पंचतत्व कार्यशाळेचा अकोलेकरांनी लाभ घ्यावा असे आवाहन शैलेंद्र कागलीवाल, शरद चांडक, अरविंद अग्रवाल सोनालावाला, दिलिप खत्री, तरण खत्री, अशोक धानुका, रितेश खेतान, ब्रजेश तापडिया, दीपक अग्रवाल, अशोक भुतडा, भूपेंद्र तिवारी, जतीन अग्रवाल, संजय राठी, किरीट मंत्री, मालपाणी, नंदकिशोर बाहेती, आर्कि अमित राठी, सुशांत राठी, गोविंद लढ्ढा, सचिन चांडक, पंकज तापडिया, शैलेंद्र तिवारी, मनोज लढ्ढा, नितीन चांडक संदीप अग्रवाल, प्रीतम निर्बाण, अनिल तापडिया, लूणकरण मालाणी आदींनी केले आहे.
इगतपुरी नंतर मुंबई-शिर्डी बायपास रस्त्यावर घोटी गावाजवळ आणि नाशिकपासून 30 किमी आणि 150 किमी अंतरावरील निर्वाण नॅचरोपॅथी सेंटर (Nirvana Naturopathy & Retreat Center) हिरवाईने वेढलेले आणि डोंगरांच्या कुशीत असलेल्या बीले तलावाच्या नयनरम्य किनाऱ्यावर वसलेले डायनॅमिक बहु-सुविधायुक्त निसर्ग उपचार केंद्र आहे.