Wednesday, January 15, 2025
Homeसामाजिकसंध्याकाळचं डायरी रायटिंग ! डॉ. विनय दांदळे यांच्या लेखसंग्रहाचे प्रकाशन

संध्याकाळचं डायरी रायटिंग ! डॉ. विनय दांदळे यांच्या लेखसंग्रहाचे प्रकाशन

अकोला दिव्य न्युज ब्युरो : वाचणाऱ्याने सदोतीत वाचत राहिले पाहिजे आणि वाचता वाचता लिहिते झाले पाहिजे.तर लिहिणाऱ्याने वाचता वाचता आपल्या मनातील तसेच आजूबाजूच्या परिसरातील ज्या काही घटना, गोष्टी  दृष्टीक्षेपात येतात.ते लेखणीतून कागदावर उतरावयाला पाहिजेत. त्या लेखणीद्वारे कागदावर उतरणे म्हणजेच शब्द साधनेची खरी फलश्रुती होय असे वक्तव्य लोकसभेच्या माजी अध्यक्ष व पद्मभूषण सुमित्रा महाजन यांनी केले. डॉ. विनय दांदळे यांच्या ” संध्याकाळचं डायरी रायटिंग” या लेखसंग्रह  प्रकाशन प्रसंगी त्या बोलत होत्या.
अमळनेर येथे पार पडलेल्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये अकोला येथील डॉ. विनय वसंतराव दांदळे यांच्या ‘संध्याकाळचं डायरी रायटिंग’ या लेखसंग्रहाचे प्रकाशन सुमित्रा महाजन यांच्या हस्ते व अ.भा. मराठी महामंडळाचे सदस्य व प्रभात किड्सचे संचालक डॉ. गजानन नारे, ज्येष्ठ कथाकार व शासन पुरस्कार वाड्मय पुरस्कारप्राप्त सुरेश पाचकवडे , दऊत लेखणीचे संपादक विजय देशमुख, विदर्भ साहित्य संघ अकोला शाखेचे प्रा. डॉ.गजानन मालोकार यांच्या उपस्थितीत झाले.
मनातील विचारांना वाट मोकळी करून देता यावी म्हणू डायरी रायटिंग असतं, आपल्या दैनंदिन जीवनातील निरीक्षणं, अनुभव, अनुभूती विविध अंगी विचार अशा सगळ्या बाबी डॉ. विनय दांदळे यांनी रसिक मनानं आणि अभ्यासूदृष्टीने या पुस्तकात मांडले आहेत असे भावोद्गार डॉ. गजानन नारे यांनी काढले, डायरी ही आपल्या जीवन  प्रवासातील साक्षीदारापेक्षा ती वाटेकरी जास्त असते, दैनंदिन आयुष्य प्रवासात माणसाच्या स्वभावाचे विविध छटा सूक्ष्मरीतीने टिपत त्यावर भाष्य व प्रकाश टाकणारे डॉ. दांदळे यांचे हे पुस्तक आहे. असे ज्येष्ठ साहित्यिक सुरेश पाचकवडे यांनी सांगितले.
डॉ. विनय दांदळे यांचं हे प्रकाशित झालेलं ३७ वे  पुस्तक असून यापूर्वी त्यांची विविध विषयांवर ३६ पुस्तके प्रकाशित झाली आहेत .  विदर्भ साहित्य संघ अकोला शाखेचे ते सचिव असून  विविध साहित्यिक चळवळींमध्ये ते सक्रिय असतात.  

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!