अकोला दिव्य न्युज ब्युरो : लहान मुलांची मानसिकता ओळखून त्यांना पडणारे प्रश्न व अडचणी कश्या सोडवाव्या ? त्यांच्या वर्तनशैलीत कशी सुधारणा करावी ? या आणि यासारख्या अनेक मुद्द्यांवर सांगोपांग विचार व्यक्त करताना, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या योग्य संवाद आवश्यक आहे. या दृष्टीने उदयोन्मुख एज्यूकेशन सोसायटीतर्फे समुपदेशन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
हॅपी अवर्स स्कुल येथील समस्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्यासाठी घेण्यात आलेल्या कार्यशाळेत बालकल्याण समितीच्या सदस्य प्रांजली जैयस्वाल यांनी मार्गदर्शन केले. यावेळी उद्योन्मुख एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा ज्योती संगर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
शिक्षकाने विद्यार्थ्यांशी चाईल्ड फ्रेंडली असले पाहिजे.अभ्यासात कुमकुवत असलेल्या विद्यार्थ्यांच्या समस्यांची नोंद ही लिखित स्वरूपात ठेऊन मुख्याध्यापकांच्या मार्फत पालकांना विश्वासात घेऊन सांगावे. आपल्याकडे जर काळजी संरक्षणाची बालके असल्यास त्यासाठी बालकल्याण समितीचे मार्गदर्शन आणि आवश्यकतेनुसार बालकांचे समुपदेशन करण्याकरिता बाल संरक्षण कक्ष किंवा चाईल्ड लाईन युनिटचे सहकार्य देण्याचे आश्वासन दिले. या सोबतच लहान मुलांची मानसिकता ओळखून त्यांना पडणारे प्रश्न व अडचणी कश्या सोडवाव्या ? त्यांच्या वर्तनशैलीत कशी सुधारणा करावी ? शिक्षकांचे मुलांसोबतचे वर्तन कसे असावे, यासाठीही मार्गदर्शन केले. अशा प्रकारे शिक्षक आणि बालक यांच्यामधील संवाद नीटनेटका होण्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाची कार्यशाळा उदयोन्मुख एज्यूकेशन सोसायटी संचलित हॅपी अवर्स स्कूल येथे पार पडली.