अकोला दिव्य न्युज ब्युरो : अकोला बार असोसिएशनची वार्षिक निवडणूक येत्या 9 फेब्रुवारीला होत असून सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे.अकोला बार असोसिएशन अध्यक्ष, उपाध्यक्ष, महिला उपाध्यक्ष आणि सहसचिव या पदासाठी निवड करण्यात येणार आहे. निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शनिवार 3 फेब्रुवारी ही शेवटची तारीख होती.
शेवटच्या दिवशी एकुण 17 अर्ज दाखल झाले असून शेवटच्या दिवशी दुपारी 3 वाजेपर्यंत अध्यक्षपदासाठी पांच, उपाध्यक्ष 5 आणि महिला उपाध्यक्षपदासाठी 2 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. जेव्हाकी सहसचिव पदासाठी 5 अर्ज दाखल आहेत. अर्जाच्या जाहीर करण्यात आलेल्या यादीनुसार अध्यक्षपदासाठी अँड.मनोज अग्रवाल, अँड. संतोष गोळे, अँड. विजय जाधव (राजेश पद्माराव), अँड. हेमसिंह मोहता व अँड. अजय वाघमारे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. उपाध्यक्ष पदासाठी अँड. नरेंद्र बेलसरे, अँड. अन्वर पठान, अँड. तुषार सिरसाट, अँड. संतोष वाघमारे, अँड. राहुल वानखडे तसेच महिला उपाध्यक्षपदासाठी दो महिला अधिवक्तांची निवड करण्यासाठी अँड. सुनिता कपिले व अँड.शीतल राऊत यांनी अर्ज दाखल केले.
सहसचिव पदासाठी अँड. कैलास अनमने, अँड. दुष्यंत धोत्रे, अँड सुमेध डोंगरदिवे, अँड. महेश शिंदे, अँड.सौरभ तेलगोटे यांनी नामांकन दाखल केले आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत 5 फेब्रुवारी असून या दिवशी दुपारच्या नंतर अंतिम यादी जाहीर करण्यात येईल. त्यानंतर खरे चित्र स्पष्ट होईल. निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांसाठी 9 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. मुख्य निवडणुक अधिकारी अँड. सत्यनारायण उपाख्य एस.एस. जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली या निवडणूकीचे कामकाज होत आहे.