अकोला दिव्य न्युज ब्युरो : विद्यार्थ्यांमध्ये गणितीय कौशल्ये वृद्धिंगत व्हावी आणि त्यांच्या बौद्धिक क्षमतांचा विकास व्हावा, या उद्देशाने केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सी.बी.एस.ई, नवी दिल्ली) द्वारे राष्ट्रीय स्तरावर आयोजित आर्यभट्ट गणित चॅलेंज स्पर्धेत प्रभात किड्स स्कूलचा इयत्ता दहावीच्या विद्यार्थी अद्वैत जोशी याने सुयश प्राप्त केले असून पुणे विभागातील गुणवंतांच्या यादीत झळकला आहे.
राष्ट्रीय स्तरावर आयोजित या स्पर्धेमध्ये देशभरातून इयत्ता आठवी ते दहावीच्या तब्बल ५,५०,००० विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेच्या दोन्ही फेऱ्यांमध्ये अद्वैत जोशी याने उत्कृष्ट प्रदर्शन केले असून पुणे विभागाच्या गुणवंतांच्या यादीत अग्रक्रमाने झळकला आहे. अद्वैत जोशी यास गणित विभागप्रमुख प्रिया शर्मा, मिथिलेश दुबे, योगेश चोपडे, अनिरुद्ध डेकाटे यांचे विशेष मार्गदर्शन प्राप्त झाले. अद्वैत यांच्या या गौरवशाली यशाबद्दल प्रभातचे संचालक डॉ. गजानन नारे, संचालिका सौ. वंदना नारे, सचिव निरज आवंडेकर यांनी कौतुक केले आहे.
प्राचार्य वृषाली वाघमारे, उपप्राचार्य अर्चना बेलसरे, व्यवस्थापक अभिजीत जोशी, शाळा समन्वयक मो. आसिफ, सी.बी.एस.ई. समन्वयक प्रशांत होळकर व शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.