अकोला दिव्य न्युज ब्युरो : छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा सादर करताना अफजल खानाचा वध दाखवल्याप्रकरणी तरुणांना माफी मागायला लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अकोल्यातील एका महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलनात हा प्रकार घडला. अफजल खानाच्या वधाचं दृश्य दाखवल्याने भावना दुखावल्याचं काही विद्यार्थ्यांनी म्हटलं. त्यानंतर नाट्य सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांना माफी मागण्यास भाग पाडण्यात आलं असं सांगितले जाते.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार या महाविद्यालयात सांस्कृतिक कार्यक्रम सुरु होता. त्यानिमित्ताने विद्यार्थ्यांनी एक छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा सादर केला होता. त्या पोवाड्यात जो इतिहास आहे तो सादर केला. मात्र त्याठिकाणी उपस्थिती काही समुदायाची मुले तिथून निघून गेले. त्यानंतर पुन्हा येऊन त्या तरुणांनी या प्रसंगामुळे आमच्या भावना दुखावल्या असून माफी मागायला लावली. जेवढे पोवाडे सादर करणारे विद्यार्थी होते त्यांनी स्टेजवर येऊन आमची माफी मागावी असं त्या मुलांनी म्हटल्याचं सुत्रांनी सांगितले.
दरम्यान जी घटना घडली ती निंदनीय आहे. महाराष्ट्राच्या पावनभूमीत अशाप्रकारे घटना घडणे हे दु:खाचे आहे. घडलेली घटना निंदनीय आहे.त्यामुळे कॉलेज प्रशासनाने या घटनेत जे कुणी सहभागी आहेत त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी सर्वच पातळ्यांवर केली जात आहे.याआधीही महाराष्ट्रात अशाप्रकारे अफजल खानाच्या वधाचे दृश्य साकारल्यामुळे काही ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेनंतर अकोला शिवसेनेचे महानगर प्रमुख राजेश मिश्रा, अँड.महेंद्र साहू, तरुण बगेरे, मंगेश काळे,सागर भारुका, नितीन मिश्रा, तसेच पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी होमिओपॅथी कॉलेजचे. प्राचार्य.डॉ.संजयकुमार तिवारी यांची भेटू घेऊन लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी व गुन्हेगारांना अटक करण्यात यावी अशी मागणी केली.
महाराष्ट्राची ओळख आज छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आहे. तिथेच छत्रपतींचा अपमान झाला आहे. ज्या मुलांनी अशाप्रकारे कृत्य केले त्यांना लवकरात लवकर कॉलेजमधून काढून टाकावे. यानंतर जर असे प्रकार घडता कामा नये. विद्यार्थ्यांनी बिल्कुल घाबरू नये. शिवसेना उबाठा त्यांच्या सदैव पाठिशी आहे असं महानगर प्रमुख राजेश मिश्रा यांनी सांगितले आहे.