Sunday, December 21, 2025
No menu items!
No menu items!
Homeकाँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल ! पुणे महापालिका अधिकाऱ्याला शिवीगाळ...

काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल ! पुणे महापालिका अधिकाऱ्याला शिवीगाळ प्रकरण.

महापालिका अधिकाऱ्याला शिवीगाळ केल्याप्रकरणी आमदार रवींद्र धंगेकर यांच्याविरुद्ध चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार धंगेकर यांच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रजासत्ताक दिनानिमित्त गोखलेनगर भागात आशानगर परिसरात महापालिकेकडून बांधण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीचे उद्घाटन करण्यात आले होते. काँग्रेसचे माजी नगरसेवक दत्ता बहिरट पाण्याची टाकी बांधण्यासाठी पाठपुरावा केला होता. टाकीच्या उद्घाटनाचे श्रेय भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी घेतल्याचा आरोप करून धंगेकर यांच्यासह कार्यकर्ते तेथे जमले होते.

धंगेकर यांनी पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी शिवीगाळ करून धमकावले होते. या घटनेची ध्वनिचित्रफीत समाजमाध्यमात प्रसारित झाली होती. धंगेकर यांनी महापालिका अधिकाऱ्याला शिवीगाळ केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर महापालिका अधिकाऱ्यांनी निषेध केला होता. भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी धंगेकर यांच्यावर टीका केली होती. जगताप यांनी फिर्याद दिल्यानंतर सोमवारी रात्री धंगेकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान, ससून रूग्णालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात भारतीय जनता पक्षाचे आमदार सुनील कांबळे यांनी नाराजी व्यक्त केली होती. या कार्यक्रमात कांबळे यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यातील एका पोलीस शिपायाला कानाखाली मारली होती. त्यानंतर कांबळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!