अकोला दिव्य न्युज ब्युरो : पक्षकारानेच कट रचून वकिल दाम्पत्याची निर्घृण हत्या केल्याचे घटना उघडकीस आल्याने महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे.निर्घृण हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीसह तीनजणांना पोलिसांनी अटक केली आहे.दरम्यान अकोला बार असोसिएशनने निषेध नोंदवत आज सोमवारी एक दिवसाचं कामकाज बंद ठेवून वकिलांचे संरक्षण कायदा त्वरित पास करावा, अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांना दिले.
अकोला बार असोसिएशनची सर्वसाधारण सभा बारच्या सभागृहात पार पडली. ॲड.राजाराम आढाव आणि मनिषा अढाव या निष्पाप वकीला दाम्पत्याच्या झालेल्या निर्घृण हत्या संदर्भात चर्चा करून ठराव मंजूर करण्यासाठी सदस्यांनी विचार व्यक्त केले. दोषीवर कठोर कारवाई करण्याचे तसेच पोलीस महानिरीक्षकांना कळवून राज्य सरकारकडे जाण्याचा निर्णय घेण्यात आला. वकिलांचे संरक्षण कायदा त्वरीत मंजूर करणे बाबत विचार विमर्श करण्यात आले. अहमदनगर पोलीस महानिरीक्षक, जिल्हा पोलीस अधीक्षक, अकोला जिल्हाधिकारी यांनी या प्रकरणाच्या निष्पक्ष तपासासाठी आवश्यक ती पावले उचलवी, अशा मागणीचे निवेदन अकोला जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
राज्य सरकारने अधिवक्ता संरक्षण कायदा संमत करण्यासाठी त्वरित पावले उचलावी. जेणेकरून अधिवक्ता मुक्त आणि निर्भयपणे न्याय प्रशासनात सहभागी होऊ शकतील,असे निवेदनात नमूद केले आहे.न्यायाच्या प्रशासनासाठी फौजदारी न्यायासह तीन शाखा आहेत, जे कार्यरत आहेत जसे की न्यायिक अधिकारी, पोलिस यंत्रणा आणि वकील, ज्यामध्ये फिर्यादी आणि बचाव पक्षाचे वकील यांचा समावेश होतो. न्यायिक अधिकारी संरक्षण कायद्यांतर्गत न्यायिक अधिकाऱ्यांना संरक्षण आहे.
लोकसेवक असलेल्या इतर पोलिस यंत्रणेलाही संरक्षण दिले जाते. Cr.P.C चे 197 तसेच लोकसेवकावर हल्ला हा अजामीनपात्र गुन्हा कलम अंतर्गत शिक्षापात्र आहे. 353 I.P.C. तथापि, केवळ बचाव पक्षाच्या वकिलांना कोणत्याही कायद्याचे संरक्षण नाही. त्यामुळे राज्य सरकारने वकिलांवरील हल्ल्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून वकिलांचे संरक्षण कायदा लवकरात लवकर मंजूर करावा. तसेच वकील दाम्पत्य आढाव यांना न्याय द्यावा, असे निवेदनात म्हंटले आहे.
निवेदन देतेवेळी अकोला बार असोसएशनचे पदाधिकारी व सदस्यसह शेकडो वकील उपास्थित होते.