Sunday, November 24, 2024
Homeताज्या घडामोडीखामगाव भूमी अभिलेख कार्यालयात शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न, यंत्रणांची तारांबळ…

खामगाव भूमी अभिलेख कार्यालयात शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न, यंत्रणांची तारांबळ…

जमीन मोजणीत अन्याय झाल्याच्या कारणावरून शेतकऱ्याने अंगावर इंधन ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने अनर्थ टळला. खामगाव येथील भूमी अभिलेख कार्यालयात ही खळबळजनक घटना घडली असून यामुळे यंत्रणांची धावपळ उडाली.

ज्ञानेश्वर पांडुरंग लांडे (राहणार आवार तालुका खामगाव) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. खामगाव येथील उपअधीक्षक भूमिअभिलेख कार्यालयाने पिंप्री गवळी येथील शेतजमिनीची मोजणी केली असता त्यात तफावत असल्याचा आरोप त्याने केला. त्यानंतर त्याने अंगावर डिझेल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र कर्मचारी व उपस्थित ग्रामस्थांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने संभाव्य अनर्थ टळला. यावेळी शेतकऱ्याने आकांत करून न्याय देण्याची मागणी केली. घटनास्थळी पोलिसांना पाचारण करण्यात आले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!