Thursday, January 2, 2025
HomeUncategorizedसंस्कार इंगलिश कान्वेंट येथे ध्वजारोहण उत्साहात

संस्कार इंगलिश कान्वेंट येथे ध्वजारोहण उत्साहात

अकोला दिव्य न्युज ब्युरो : स्थानिक निमवाडी येथील मारवाड़ी ब्राहमण संस्कृत विद्यालयतर्फे संचालित संस्कार इंगलिश कान्वेंट येथे 26 जानेवारीरोजी गणतंत्र दिनाला ध्वजारोहण सोहळा उत्साहात पार पडला. संस्थेचे संचालक अमर गौड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हरिप्रसाद शर्मा होते. विशेष पाहुणे म्हणून कमल किशोर, हरितवाल, महेन्द्र जोशी, राजेश सीवाल, कृष्ण कुमार शर्मा, देवकी ननंदन शर्मा, योगेश तिवारी, मुख्याध्यापक सौ राधिका वाडेगावकर उपस्थित होते.

सरस्वती व भारत माताचे प्रतिमेचे पूजन व दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. शालेय विद्यार्थ्यांनी देशभक्ति भाषण आणि गीत सादर केले. लेझीम आणि डम्बल कवायद सादर करून उपस्थितांची मने जिंकली, कार्यक्रमाचे संचालन मेघा साहु यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.
,

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!