Wednesday, January 15, 2025
Homeसामाजिकडेल्टा टीव्हीएसकडून श्रीराम मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे एलईडीवर प्रक्षेपणासह भजन कीर्तन ! संध्याकाळी...

डेल्टा टीव्हीएसकडून श्रीराम मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे एलईडीवर प्रक्षेपणासह भजन कीर्तन ! संध्याकाळी महाआरती

अकोला दिव्य न्युज ब्युरो : जवळपास ५०० वर्षाच्या प्रतीक्षेनंतर अयोध्यातील नवनिर्मित मंदिरात श्रीराम मुर्ती प्राणप्रतिष्ठापनाप्रसंगी डेल्टा टीव्हीएस येथे ५०१ दिव्याची महाआरती आणि सकाळी 8 वाजेपासुन भजन कीर्तनासह एल.ए.डी.वाॅल वरुन थेट श्रीराम मंदिरातील प्राणप्रतिष्ठापनाचा अविस्मरणीय व मंगलमय सोहळ्याचा लाभ शेकडो भाविकांना मिळवून दिला.

भाजप नेते व माजी नगराध्यक्ष हरीशभाई आलिमचंदानी, श्री.आळशी प्लॉट मित्र मंडळ आणि श्री.हरीषभाई आलीमचंदानी मित्र मंडळ च्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सकाळपासुन श्रीराम मंदीर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे थेट प्रक्षेपणासह भजन आणि कीर्तनचा आनंद उपस्थितांनी घेतला.

संध्याकाळी झालेल्या महाआरतीला आ.वसंत खंडेलवाल, सिधीं पूज्य पंचायतचे हरिशभाई आलीमचंदानी, जनता बॅकचे माजी सरव्यवस्थापक प्रदीप गोयनका, मुकेश आलीमचंदानी, कमल आलीमचंदानी, कातांताई आलीमचंदाणी, ॲड. प्रियंका जैन, सुनिता व निशा आलीमचंदानी सोबतच बहुसंख्य महीला-पुरुष आपल्या परिवारासह उपस्थित होते. अतिशय आनंद, उत्साह आणि धार्मिक वातावरणा जयश्रीराम जयजयश्रीराम नामाचा जयघोष सुरु होता. यावेळी आकर्षक आतिशबाजी करण्यात आली. आयोजन समिती तर्फे प्रत्येक ताटात ५ दिवे, फुल आणि कापुर असे १५१ ताट सजावुन भाविकांना उपलब्ध करून देण्यात आले होते.

महाआरतीनंतर प्रसाद वितरण करण्यात आले. शहरातील विविध ठिकाणी हरिशभाई आलिमचंदानीतर्फे 25 हजारांच्यावर भाविकांना बूंदीचा प्रसाद वाटण्यात आला. प्रसिद्ध डमरूवाले महाकाल बॅडने अतिशय लयबद्ध वाद्य वाजवून उपस्थितांची मने मोहून त्यांना ठेका घेऊन नाचण्यास भाग पाडले. तरुणाईचा जल्लोश पाहण्या सारखा होता. कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता अरुण आलिमचंदानी, श्री.आळशी प्लॉट मित्र मंडळ, श्री. हरिशभाई मित्र मंडळ, डेल्टा टीव्हीएसचे कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!