अकोला दिव्य न्युज ब्युरो : विश्वाचे आराध्य, मर्यादा पुरुषोत्तम प्रभु श्रीराम यांचे अयोध्येतील नवनिर्मित मंदिरात त्यांच्या बाल स्वरूप नवीन मुर्तिची २२ जानेवारीला प्राणप्रतिष्ठा केली जात आहे. यावेळी संपूर्ण भारतात आनंद उत्सव साजरा केला जात असून, राजराजेश्वर महाराजांच्या पावन नगरीत विश्व हिन्दु परिषद आणि श्री रामनवमी शोभायात्रा समितीकडून विविध धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या ऐतिहासिक क्षणाचे माता,भगिनी, समाजबांधव व रामभक्तांनी साक्षीदार राहण्यासाठी सोमवार दिनांक २२ जनवरी २०२४ पौष शुल्क द्वादशी, सवंत २०८०या शुभदिनाच्या पुर्वसंध्येला शनिवार दिनांक २० जानेवारीला सिटी कोतवाली जवळील महाराणा प्रताप बागीसमोर साकारण्यात आलेल्या श्रीराम दरबार झांकीचे उद्घाटन दुपारी ४ वाजता करण्यात येणार आहे. तसेच रविवार दिनांक २१ जानेवारीला श्री राम मंदिर तिलक रोडवरील प्राचीन श्री राम मंदिर येथे सकाळी ९ वाजता श्रीराम यज्ञ करण्यात येणार आहे. तर दुपारी ४ वाजता भजन किर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे.
अयोध्येतील मुख्य प्राणप्रतिष्ठा श सोहळ्याच्या दिनी अर्थात सोमवार दिनांक २२ जानेवारीला सकाळी ९ वाजता श्रीराम पादुका आणि त्यानंतर ११ वाजता प्राणप्रतिष्ठा समारंभ श्री राम मंदिर येथे योजिले आहे.तेव्हा तमाम धर्मप्रेमी नागरिक, माता, भगिनी, समाजबांधव व रामभक्तांनी तीनही कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहून या अभुतपुर्व सोहळ्यात सहभागी व्हावे असे आवाहन विश्व हिन्दु परिषद आणि श्री रामनवमी शोभायात्रा समितीकडून करण्यात आले आहे.