Thursday, December 26, 2024
Homeअपघातदुध डेअरी समोर भिषण अपघात ! नशीब बलवत्तर असल्याने चालक वाचला

दुध डेअरी समोर भिषण अपघात ! नशीब बलवत्तर असल्याने चालक वाचला

अकोला दिव्य न्युज ब्युरो : वेगात असलेल्या चारचाकी महिंद्रा पिकअँप व्हॉनचे अचानक एॅक्सल तुटून चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी रोडडिव्हॅयडर वरील विद्युत खांबावर जोरदार धडकून भिषण अपघात झाला.गाडीचा समोरचा भाग अक्षरशः चक्काचूर झाला. नशीब बलवत्तर म्हणून चालकाचा जीव वाचला. चालक किरकोळ जखमी झाला असून, सिव्हिल लाईन पोलिस ठाण्यात अपघाताची माहिती दिल्यानंतरही जवळपास चार तास उलटून, वृत्त देईस्तोवर घटनास्थळ पंचनामा करण्यास पोलिस घटनास्थळी पोहचले नाही. तर अपघातग्रस्त गाडी बघण्यासाठी बघ्याची गर्दी होत आहे. सदर अपघात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील शासकीय दूध डेअरी समोर सकाळी ६ वाजताच्या सुमारास झाल्याचे सांगितले जात आहे.

मुर्तीजापूरकडून अकोला शहरात येत असताना, हायवे आयर्नच्या पुढे आणि दूध डेअरीच्या अलिकडे अचानक या व्हॅनचा एक्सल तुटला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी रोड डिव्हायडरवर चढून विद्युत खांबावर जोरदार धडकली. गाडीचे समोरचे एक चाक निखळून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जाऊन पडले.

गाडीचा समोरचा भाग चक्काचूर झाला. चालकाच्या पायाला किरकोळ जखमा झाल्या.अपघातग्रस्त गाडी बघितल्यावर जीवित हानी झाल्याचे दिसून येते.पण चालक नशीबवान असल्याने मोठे संकट टळले. गाडी जास्त वेगात असती आणि मागून एखादेवेळी दुसरे वाहन असते तर मोठी दुर्घटना घडली असती.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!