Friday, November 22, 2024
HomeUncategorizedमथुरा, शाही ईदगाहचे सर्वेक्षण होणार नाही; सुप्रीम कोर्टाची हायकोर्टाच्या आदेशाला स्थगिती

मथुरा, शाही ईदगाहचे सर्वेक्षण होणार नाही; सुप्रीम कोर्टाची हायकोर्टाच्या आदेशाला स्थगिती

सुप्रीम कोर्टाने मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरणात हिंदू पक्षाला झटका दिला आहे. सुप्रीम कोर्टाने अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. या प्रकरणात शाही ईदगाहचे सर्वेक्षण करण्यासाठी न्यायालयीन आयुक्त नियुक्त करण्याचे आदेश देण्यात आले होते. 

गेल्या वर्षी १४ डिसेंबर रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाने मथुरा येथील श्री कृष्ण जन्मभूमी मंदिराशेजारील शाही ईदगाह संकुलाच्या सर्वेक्षणास मान्यता दिली होती, त्याविरोधात मुस्लिम पक्षाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने मुस्लीम बाजूच्या याचिकेवर सुनावणी करताना सांगितले की, या प्रकरणाची सुनावणी उच्च न्यायालयात सुरूच राहील, पण सर्वेक्षण करण्यासाठी न्यायालयीन आयुक्तांच्या नियुक्तीला अंतरिम स्थगिती दिली जाईल. 

सुप्रीम कोर्टाने हिंदू पक्षावर प्रश्न उपस्थित केले आणि सांगितले की, तुमचा अर्ज स्पष्ट नाही. तुम्हाला काय हवे आहे ते स्पष्टपणे सांगावे लागेल. याशिवाय बदलीचे प्रकरणही न्यायालयात प्रलंबित आहे. त्यावरही निर्णय घ्यायचा आहे.

सर्वेक्षणाची केली होती मागणी

शाही ईदगाहमध्ये सर्वेक्षणाच्या मागणीसाठी वकील हरी शंकर जैन, विष्णू शंकर जैन, प्रभास पांडे आणि देवकी नंदन या वकीलांमार्फत अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यात त्यांनी ASI सर्वेक्षणाची मागणी केली होती.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!