Wednesday, January 15, 2025
Homeइतिहास'राम मंदिर' हे नियतीने आधीच ठरवलं होतं ! लालकृष्ण आडवाणींच्या लेखाची चर्चा

‘राम मंदिर’ हे नियतीने आधीच ठरवलं होतं ! लालकृष्ण आडवाणींच्या लेखाची चर्चा

अकोला दिव्य न्युज ब्युरो : अयोध्येत राममंदिर होणार असल्याचं नियतीने आधीच ठरवलं होतं. रथयात्रा सुरु झाल्यानंतर काही दिवसांतच मला हे लक्षात आलं की माझी त्यातली भूमिका फक्त सारथ्य करण्याचीच होती. रथयात्रेचा संदेश हा त्या रथानेच दिला. कारण मंदिर पूर्ण व्हावं यासाठीच ही रथयात्रा काढण्यात आली होती.या ऐतिहासिक क्षणी मला अटलजींची (अटल बिहारी ) आठवण येते आहे. असं लालकृष्ण अडवाणी यांनी ‘राम मंदिर का निर्माण-एक दिव्य स्वप्न की पूर्ति’ हे शीर्षक देऊन लिहिलेल्या लेखात ते म्हणतात, तसंच ते पुढे लिहितात,राम मंदिराची रथयात्रा आंदोलनाचं रुप घेईल हे आम्हाला माहीत होतं. माझ्या राजकीय कारकिर्दीत रथयात्रेने मोठा बदल घडवला असंही त्यांनी लेखात म्हटलं आहे. NDTV ने या विषयीचं वृत्त दिलं आहे.

अयोध्येत राम मंदिराचं उद्घाटन व रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा २२ जानेवारी या दिवशी केली जाणार आहे.अयोध्येत राम मंदिर बांधलं जावं यासाठी रथयात्रा काढण्यात आली होती. या रथयात्रेचे प्रमुख होते ते म्हणजे लालकृष्ण आडवाणी. लालकृष्ण आडवाणी यांना राम मंदिर उद्घाटन सोहळा आणि प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलं आहे. ते या सोहळ्याला उपस्थित राहणार असून, त्याआधी त्यांनी राम मंदिरावर लेख लिहिला आहे. लालकृष्ण आडवाणी यांचा हा लेख ‘राष्ट्रधर्म’ मध्ये १५ जानेवारी २०२४ या दिवशी छापून येणार आहे.

रामाचे गुण आपण अंगिकारावेत यासाठी हे मंदिर माझ्यासह प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देणारं ठरेल असंही आडवाणी यांनी त्यांच्या लेखात म्हटलं आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!