Friday, January 3, 2025
Homeगुन्हेगारीअकोल्यात हत्या ! रेल्वे स्थानक परिसरात खळबळ; नवीन वर्षात ३ रा खून

अकोल्यात हत्या ! रेल्वे स्थानक परिसरात खळबळ; नवीन वर्षात ३ रा खून

अकोला दिव्य न्युज ब्युरो : अकोला रेल्वे स्थानक परिसरात ऐन सायंकाळच्या सुमारास धारदार शस्त्राने सपापप वार करुन, युवकाची हत्या करण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. नवीन वर्ष सुरु होण्यास जेमतेम १२ दिवसाचा कालावधी होत नाही तोपर्यंत शहरात ३ जणांची हत्या झाल्याने अकोलेकरांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी संशयावरून एकाला अटक केली आहे.

अकोला रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे हॉस्पिटल मागील भागात नवीन तापडिया नगर भागातील दुबेवाडी रहिवासी रमेश प्रकाश कामेलू नामक (वय३६ वर्ष) इसमावर अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने सपापप वार करुन पळ काढला. गंभीरपणे जखमी झालेल्या रमेशचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच एसडीपीओ सुभाष दूधगांवकर, रामदेव पेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक मनोज बहुरे, जीआरपीचे ठाणेदार अर्चना गाडवे, रेल्वे पोलिस ठाण्याचे युनूस खान तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक व टीम आणि फॉरेन्सिक विभागाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी पोचले.

घटनास्थळ पंचनामा करून, मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सर्वोपचार रुग्णालयात पाठविण्यात आला. दरम्यान याप्रकरणी एकाला अटक करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

( सविस्तर वृत्त लवकरच )

.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!