Tuesday, January 21, 2025
Homeसामाजिकअयोध्येतील उघड्यावर बांधलेल्या शौचालयांचे धक्कादायक Video? दाटीवाटी पाहून होईल संताप

अयोध्येतील उघड्यावर बांधलेल्या शौचालयांचे धक्कादायक Video? दाटीवाटी पाहून होईल संताप

अकोला दिव्य न्युज ब्युरो : लाइटहाऊस जर्नलिझमला अयोध्येतील निर्माणाधीन भारतीय शौचालयांचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असल्याचे लक्षात आले आहे. हा व्हिडिओ अलीकडचा आणि अयोध्येचा असल्याचा दावा करण्यात आला होता. अयोध्येला भेट देणाऱ्यांसाठी व्यवस्था केली जात असल्याचे कॅप्शनमध्ये सांगण्यात आले आहे. उघड्यावरच भारतीय शौचालयांच्या दोन रांगा बांधण्यात आल्या आहेत. अगदी एकमेकांच्या समोरासमोर असणाऱ्या या रांगा बघून थक्क झाल्याचे अनेकांनी कमेंटमध्ये म्हटले आहे. नेमकं हे प्रकरण काय हे सविस्तर पाहूया..

तपास:
आम्ही InVid टूलमध्ये व्हिडिओ अपलोड करून आणि त्यातून कीफ्रेम घेऊन तपास सुरू केला. त्यानंतर आम्ही प्रत्येक फ्रेमवर रिव्हर्स इमेज सर्च केला. असे केल्यावर, आम्हाला काही YouTube व्हिडिओ आढळले ज्यात व्हिडिओ वाराणसीचा असल्याचे नमूद केले होते.

आम्‍हाला स्‍वरवेद महामंदिर धाम वाराणसी येथील ‘एएमटी यूट्यूबरचा’ व्‍लॉग दिसून आला, त्याचे उद्घाटन होण्‍यापूर्वी शौचालयांचे बांधकाम व्हिडिओमध्ये दाखवण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!