अकोला दिव्य न्युज ब्युरो : देश-विदेशातील कोट्यावधी भाविक-भक्त आणि देशवासीयांचे आराध्य भगवान श्रीराम यांची जन्मभूमी असलेल्या अयोध्या येथे नवनिर्मित मंदिरातील गर्भगृहात प्रभू रामचंद्र बालरुप विग्रह विराजमान करुन प्राणप्रतिष्ठापना केली जात आहे. आयोध्यातील मंदिरात २२ जानेवारीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या मंगलपर्वावर मारवाडी प्रेस परिसरात तीन दिवस श्रीराम उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून यासाठी ‘श्रीराम दरबार’ ची विशाल व मनमोहक,आकर्षक प्रतिकृती उभारण्यात येत आहे.
पश्चिम विदर्भात गणेशोत्सवासाठी भाविकांच्या आकर्षणाचे केंद्र असलेल्या श्री मारवाडी प्रेस गणेशोत्सव मंडळाकडून शनिवार १९ जानेवारीपासून सोमवार २२ जानेवारीपर्यंत दररोज सायंकाळी ५ ते रात्री १० वाजतापर्यंत ‘श्रीराम दरबार’ रामभक्तांना दर्शनासाठी खुले राहणार आहे. या उत्सवाचा आरंभ शनिवार दिनांक २० जानेवारी रोजी होत आहे. अयोध्येतील श्रीराम मुर्ती प्रतिष्ठापना उत्सवाच्या पर्वावर गणेशोत्सव साजरा करण्याची आपली परंपरा कायम ठेवण्यासाठी प्रख्यात, श्री मारवाडी प्रेस गणेशोत्सव मंडळाकडून गणेश भक्तांसह रामभक्त व भाविकांना आनंदोत्सव साजरा करण्याची एकवेगळी पर्वणी आहे.
श्रीराम दरबारची भव्य प्रतिकृती उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. तापडिया प्रेस परिसरात दिव्यांची भव्य आरास करून, संपूर्ण परिसरात भक्तीमय वातावरणात निर्मिती केली जात आहे. रामललाच्या या भक्तिमय उत्सवात राम भक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन श्री तापडिया प्रेस गणेशोत्सव मंडळातील समस्त पदाधिकारी व सेवाधारींनी केले आहे.