अकोला दिव्य न्युज ब्युरो : राज्याच्या पुरवठा विभागाने दिलेल्या आश्वासनानंतर अकोला जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक संघटनेने पुकारलेला संप मागे घेण्यात आला आहे. त्यानुसार आज बुधवार १० जानेवारीपासून अकोला शहर व जिल्ह्यातील धान्य वितरण सुरु होत आहे.अशी माहिती अकोला महानगराध्यक्ष योगेश अग्रवाल यांनी दिली.
जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या दालनात मंगळवार ९ जानेवारीला संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत संघटनेच्या सर्व मागण्या शासनस्तरावर लवकरात लवकर सोडवण्याचे आश्वासन जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी दिल्यानंतर आज बुधवार 10 जानेवारी 2024 पासून शहर व जिल्ह्यातील धान्य वितरण सुरू करण्यास संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मान्य केले आहे. त्यामुळे आजपासून जिल्ह्यातील धान्य वितरण सुरू करण्यात येईल.
या बैठकीत जिल्हाध्यक्ष महेश शर्मा, जिल्हा कार्यकारी अध्यक्ष कैलास महाजन, महानगराध्यक्ष योगेश अग्रवाल, जिल्हा सचिव अमोल सातपुते, मोहम्मद अरिफ, अकोला तालुका अध्यक्ष शंकरराव झटाले, पातुर तालुका अध्यक्ष पंडितराव देशमुख, बार्शीटाकळी तालुका अध्यक्ष सुरेंद्र चव्हाण, बाळापुर तालुका अध्यक्ष भास्कर कराळे, तेल्हारा तालुका अध्यक्ष जगन्नाथ दुतोंडे, अकोट तालुका अध्यक्ष मोहन इंगळे तसेच नितेश गांधी, संजय थावरानी, गजानन घुले, राहुल रुमटा, मोहम्मद शोएब शेख जावेद , शेख रसूल ,ऋतुराज शुक्ला, पंकज शुक्ला ,पंकज अवस्थीसह मोठ्या संख्येने दुकानदार उपस्थित होते.