गेल्या ८ ते १० महिन्यांपासून राज्यात चर्चेत असणाऱ्या शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावरील निकालाची अवघ्या राज्याला प्रतीक्षा होती. या निकालावरून शिंदे गट व ठाकरे गट या शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये गेल्या ८ महिन्यांत राजकीय सुंदोपसुंदी पराकोटीला पोहोचली. अखेर सगळ्यांचं लक्ष लागलेल्या या सुनावणीचा निकाल राहुल नार्वेकरांनी सविस्तरपणे मांडला असून प्रामुख्याने ६ निर्णयांचा त्यांनी आपल्या निकालात अंतर्भाव केला आहे.
राहुल नार्वेकरांचा अंतिम निकाल…
१. शिंदे गट खरी शिवसेना आहे.
२. भरत गोगावलेंची प्रतोदपदी नियुक्ती वैध ठरते.
३. एकनाथ शिंदेंची गटनेतेपदी निवड वैध ठरते.
४. ठाकरे गटाच्या नोटीसप्रमाणे शिंदे गटाचे सदस्य संपर्काच्या बाहेर गेल्याचं सादर पुराव्यांवरून सिद्ध होत नाही.
५. सुनील प्रभूंना पक्षासाठी कोणतीही बैठक बोलावण्याचा अधिकार नव्हता. त्यामुळे शिंदे गटाच्या सदस्यांवर अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी फेटाळली जात आहे.
६. शिंदे गटानं दाखल केलेली ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र करण्याची मागणीही फेटाळली जात आहे.
हा निकाल म्हणजे निर्लज्जपणाचा कळस – उद्धव ठाकरेहा निकाल म्हणजे निर्लज्जपणाचा कळस आहे. मला तर वाटतं की सर्वोच्च न्यायालयाचा त्यांनी जो अपमान केला आहे, त्यावर अवमान याचिका दाखल करता येते का, हे पाहिलं पाहिजे. विधानसभा अध्यक्षांना असणाऱ्या घटनात्मक संरक्षणाचा त्यांनी गैरफायदा घेतला आहे – उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया…सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश हे सर्वोच्च असतात. पण नार्वेकरांनी न्यायालयाने दिलेले सर्व निर्देश पायदळी तुडवले. आमच्यामागे महाशक्ती असून आम्ही सर्वोच्च न्यायालयालाही जुमानत नाही, हे त्यांच्या निकालामुळे दिसून आलंय. त्यांनी कुणालाच अपात्र ठरवलेलं नाही. आमची घटना ग्राह्य नसेल, तर आम्हाला अपात्र का नाही केलंत?.