अकोला दिव्य न्युज ब्युरो : महाराष्ट्र राज्य अग्रवाल संमेलनाच्या 26 व्या प्रांतीय अधिवेशनात विदर्भातील प्रख्यात कापूस व्यावसायीक व उद्योजक शिवप्रकाश रुहाटिया यांना अग्रश्री पुरस्काराने गौरविण्यात आले.अकोला येथे नुकत्याच पार पडलेल्या दोन दिवसीय अग्रवाल संमेलनात राज्यातील विविध जिल्ह्यातून आलेल्या हजारो अग्रवाल समाजाचे महिला, पुरुष यांच्या उपस्थितीत समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अग्रवाल समाज बांधवांचा अग्रभूषण व अग्रश्री पुरस्कार देऊन सन्मान करण्याच्या परंपरेत, वृंदावन येथील साध्वी ध्यानमूर्ती महाराज, प्रवचनकार आचार्य वाघेश आणि मथुरा येथील संत हेमलता शास्त्री यांच्या हस्ते शिवप्रकाश रुहाटिया यांना शाल, श्रीफळ व स्मृती चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी संमेलनाचे प्रांतीय अध्यक्ष विजयकुमार चौधरी, माजी आमदार गोपीकिसन बाजोरिया, माजी आमदार बबनराव चौधरी, संमेलनाचे कार्याध्यक्ष रमाकांत खेतान, स्वागताध्यक्ष सुशील खोवाल, जनता बँकेचे अध्यक्ष ज्ञानचंद गर्ग, प्रांतीय अधिवेशन समन्वयक रामनिवास गुप्ता, संघटन मंत्री कमलकिशोर अग्रवाल, शैलेंद्र कागलीवाल, आनंद भारुका, सुनील सिंघानिया, शिवगोपाल भरतिया, संदीप चौधरी, रतनलाल अग्रवाल, अग्रोहा विकास संस्थेचे अध्यक्ष शितलकुमार अग्रवाल, महिला शाखा महामंत्री उषा अग्रवाल, लता खिरवाल, महिला मंडळाच्या संतोष केडिया, यश अग्रवाल उपस्थित होते. ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढून यावेळी जल्लोष करण्यात आला.
अकोला येथे स्व. कालुरामजी रुहाटिया यांनी लहान स्वरूपात सुरु केलेल्या कापूस व्यवसायाचे आज मोठे वटवृक्ष झाले असून, जिनींग प्रेसींग आणि कापूस गाठीच्या उत्पादन क्षेत्रात रुहाटिया गृप एक मोठे प्रस्थ आहे.तर अलिकडच्या काळात रुहाटिया गृप ऑफ कंपनीज् मधून कालूराम फुड प्रोडक्ट्स मध्ये शेंगदाणे तेल , सोयाबीन व सनफ्लॉवर आणि कच्चीघाणी मस्टर्ड खाद्यतेल, खाण्याचे मीठ तसेच पशु आहार,अॅक्वा वॉटर, कापड धुण्याचे साबण इत्यादी विविध खाद्य वस्तूंचे उत्पादन तयार केले जाते. अल्पावधीतच ही सर्व उत्पादने ग्राहकांच्या विश्वास व पसंतीला खरी उतरली असून. शिवप्रकाश रुहाटिया आज या व्यवसायाचे आधारवड आहेत.