अकोला दिव्य न्युज ब्युरो : स्पोर्ट्स कार्निवल-2023-24 या आंतरशालेय क्रीडा स्पर्धा 5 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धामध्ये प्रभात किड्स स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आपल्या खेळाची चमक दाखवून प्रथम क्रमांकासह स्पोर्ट कार्निवल चषक पटकाविला.अकोला एज्युकेशन सोसायटीद्वारे संचालित स्थानिक ज्युबिली इंग्लिश स्कूल येथे विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा गुणांचा विकास व्हावा या उद्देशाचे आयोजित करण्यात आलेल्या स्पोर्ट कार्निवलमध्ये अकोला शहरातील 15 शाळेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
प्रभातच्या स्कूलच्या 64 विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. ज्युबिली इंग्लिश स्कूलचे उपाध्यक्ष अमरावतीकर, प्रायमरीच्या मुख्याध्यापक शालिनी चतुर्विदी यांच्याहस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.स्पोर्ट कार्निवलमध्ये प्रभातच्या खेळाडूंनी उत्कृष्ट यश संपादीत केले. शटल रनमध्ये इयत्ता पहिलीचा देवांश पाटील व बटाटा शर्यतीत मनन कटारीयाने प्रथम क्रमांक मिळवून यश प्राप्त केले. तसेच शटल रनमध्ये दुसरीचा हर्षल दळवी व बटाटा शर्यतमध्ये साहिल सुलताने (प्रथम) व 50 मिटर रनिंगमध्ये तिसरीचा हरिसाई पाकधने प्रथम क्रमांक मिळविला. तर 3 लेग रेसमध्ये आयुष डिक्कर व पार्थ कांबळे (प्रथम) व बॉल टनल रेसमध्ये तिसरीचा सोहम गावंडे, अमित साबळे, सर्वज्ञ चुनडे, रुबल मते व विश्वजीत चतरकर (प्रथम) आले. तसेच 50 मिटर रनिंगमध्ये चवथीचा विराज माळीपाटील (प्रथम) त्याचप्रमाणे सॅक रेसमध्ये जय गुप्ता (प्रथम) क्रमांक मिळविला. तसेच चेस मेडिसीन थ्रोमध्ये आर्यन राठोड (प्रथम) क्रमांक मिळवून उज्वल यश प्राप्त केले.
बॉल टनल रेसमध्ये सोहम मोरे, आराध्य कुकडे, अंगत पटके, देवांश नांदे, सोहम चेतवानी (द्वितीय) व रस्सीखेचमध्ये श्रीपाद महल्ले, विराज काकड, अभिराज गावंडे, गजानन काळणे, सिद्धार्थ देशमुख, श्रीश लावोरे, देवांश वोरा, आर्यन चिमा (प्रथम) तर मुलींमध्ये कार्ड बोर्ड रेसमध्ये दुसरीची तयना लोहकपुरे (द्वितीय) तसेच 3 लेग रेसमध्ये तिसरीची सावी भांगे व अक्षया खुरपे (प्रथम), बॉल टनल रेसमध्ये पलक टोपरे, अनन्या तायडे, अभिनीती नाकट, देवांशी चतरकर, मयुरी मुरुमकार (द्वितीय), चेस मेडिसीन थ्रोमध्ये चवथीची अन्वी साठे (प्रथम) तर बॉल टनल रेसमध्ये कामना वोरा, शिवाली साखरे, फाल्गुनी उजाडे, अनुष्का वनवे, शिवांजली नवलकार (द्वितीय) त्याचप्रमाणे रस्सीखेचमध्ये नित्या चव्हाण, समृद्धी चव्हाण, गौरी गायकवाड, दिया रायकेश, स्वरा गनोडे, गरीमा भाटीया, गौरी निकामे, मोक्षदा रसाळेने प्रथम क्रमांक मिळवून यश प्राप्त केले.
तसेच प्रभातच्या मोद शिंदे, रुद्र टोंगळे, ज्ञानदा अलोने, कृष्णा धोरण, माही पवार, अनन्या रायपुरे, स्वरा रेचे, अनघा माने, आनंदी भटकर, निया बालसराफ, प्रत्युश ढगेकर, प्रसिद्धी भिरड, श्रीतेज ठाकरे व प्रणाली गवई यांनी सुद्धा या कानिर्वलमध्ये सहभाग घेतला.
प्रभातचे संचालक डॉ. गजानन नारे, संचालिका सौ. वंदना नारे, सचिव निरज आवंडेकर, प्राचार्य वृषाली वाघमारे, उपप्राचार्य अर्चना बेलसरे, समन्वयक मो.आसिफ, क्रीडा विभाग प्रमुख संतोष लोमटे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्यांनी विजयी खेळाडूंची कौतुक करून पुढील स्पर्धेकरीता शुभेच्छा दिल्या.