अकोला दिव्य न्युज ब्युरो : माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रिंट मीडियासोबत इलेक्ट्रानिक मीडिया आणि वेबपोर्टलमुळे आता पत्रकारितेचे क्षेत्र विस्तृत झाले आहे. यासोबतच पत्रकारितेत देखील परिवर्तन होत आहे. नवनवीन आव्हाने उभी राहिली असून या नवीन आव्हानांचा सामना करताना, पत्रकारांनी सत्कारात्मक पत्रकारिता केली पाहिजे, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार यांनी केले.
आद्य पत्रकार बालशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ अकोला जिल्हा पत्रकार संघाकडून पत्रकार भवनमध्ये आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी पत्रकार परिषदेचे माजी अध्यक्ष सिध्दार्थ शर्मा होते. जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार पुढे म्हणाले की, बदलत्या काळानुसार स्वतःला अपटेड करने काळाची गरज असून भविष्यात उपयोगी पडेल अशा माहितीपूर्ण लेख आणि बातम्यां पत्रकारांनी जतन करून ठेवाव्यात. जिल्हा माहिती कार्यालय पत्रकार आणि शासन यांच्यातील दुवा आहे. ही माझी भूमिका असून पत्रकारांच्या अडचणी सोडविण्यासाठी आपण सदैव प्रयत्नशील आहोत, अशी पवार यांनी ग्वाही दिली.
पत्रकार संघाचे अध्यक्ष शौकतअली मीर साहब यांनी तेल्हारा पत्रकार भवनात पत्रकार दिनानिमित्त आयोजित मोठ्या कार्यक्रमाची माहिती देताना सांगितले की, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील या कार्यक्रमाचे उद्घाटन करणार होते. पण काही कारणांनी ते येऊ शकले नाहीत. म्हणून आज होणारा कार्यक्रम स्थगित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम पुढील महिन्यात आयोजित करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला जिल्हा माहिती अधिकारी मान्यवरांच्या हस्ते बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या वेळी सिध्दार्थ शर्मा यांनी पत्रकार रक्षण कायद्यातील उणिवा दूर करुन सक्षम कायदा लागू करण्याची मागणी केली.कार्यक्रमाचे संचालन संघाचे सरचिटणीस प्रमोद लाजुरकर यांनी तर आभार प्रदर्शन वरिष्ठ उपाध्यक्ष गजानन सोमाणी यांनी केले.
कार्यक्रमाला रामदास वानखडे, दीपक देशपांडे, रामविलास शुक्ला, अँड. शरद गांधी, प्रा.मोहन खडसे, विजय सारभूकन, विलास खंडारे, वंदना शिंगणे, नीलिमा शिंगणे, सत्यशील सावरकर, उमेश जामोदे, कमलकिशोर शर्मा, समाधान खरात, राजेंद्र बाहेती, शेख हबीब, प्रकाश भंडारी, अजय जहागीरदार, मुकुंद देशमुख, विनायक पांडे, सोनल इंगळे, फूलचंद मौर्य, गजानन देशमुख, संदीप कटारे, राम तिवारी, सर्वेश कटियार, तुषार हांडे, आदि पत्रकार उपस्थित होते.