अकोला दिव्य न्युज ब्युरो : स्थानिक श्रीमती ल.रा.तो. वाणिज्य महाविद्यालयात एम.सी.एम. विभाग प्रमुख म्हणून कार्यरत प्रा. डॉ. तुलसीदास गणपतराव मिरगे यांच्या सेवानिवृत्ती निमित्त निरोप व सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. समारंभाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.डी. सिकची होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कॉलेज कौन्सिलच्या सचिव प्रा.डॉ वंदना मिश्रा यांनी केले. प्रा डॉ टी.जी.मिरगे यांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले, तसेच सेवानिवृत्तीबद्दल आणि त्यांनी प्रदान केलेल्या सेवांबद्दल शाल-श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांच्या पत्नी सुचेता मिरगे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
डॉ. मिरगे यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले की, महाविद्यालयातील कार्यकाळादरम्यान आलेल्या अनुभवांना आणि आठवणींना उजाळा दिला. प्राचार्य डॉ. सिकची यांनी देखील डॉक्टर मिरगे बरोबर महाविद्यालयस्तरावर काम करताना आलेल्या अनुभवांच्या आठवणींवर प्रकाश टाकला.डॉ टी.जी.मिरगे यांच्या सेवानिवृत्तीनंतरच्या सुखीसमाधानी व समृद्धआयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. सेवानिवृत्तीनंतरच्या काळात सामाजिक कार्यांमध्ये आपला मोठा वाटा ते नक्की उचलतील अशी अपेक्षाही व्यक्त केली.
या कार्यक्रमात महाविद्यालयाचे डॉ. महेश डाबरे, डॉ. कविता फाटे, अनिल पालवे यांनी मनोगत व्यक्त केले. त्यांच्या सेवा कार्याचे प्राध्यापक दीपिका बियाणी यांनी उत्कृष्ट पावर पॉइंट प्रेझेंटेशन केले. विद्यार्थ्यांनी सेवानिवृत्तीला अनुसरून उत्कृष्ट नृत्य सादर केले. शेवटी प्राध्यापक डॉ अनिल तिरकर यांनी आभार प्रदर्शन केले. मिरगे यांचे कुटुंब, विभागप्रमुख तसेच प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी, विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.