अकोला दिव्य न्युज ब्युरो : समाजातील सर्वच घटकांमध्ये काल-परवांपर्यंत भिती, आदर आणि शुभप्रसंगी सन्मानित असलेल्या तृत्तीय पंथीयांच्या नव्या पिढीकडून चक्क गुंडगिरी केल्या जात आहे. लोकांकडून बळजबरीने अक्षरशः खंडणी वसूल केली जात असून वेळप्रसंगी बेछूट मारहाण करण्याच्या घटना वाढत चालल्या आहेत. अलिकडे रेल्वेत हिजड्यांना बघितले की काळीज धडधडायला लागते.अशातच काल पुणे ते हटिया रेल्वेत हिजड्याचे हावभाव आणि वेशभूषा असलेल्या ६ जणांनी बेदम मारहाण करून १० जणांना लुबाडण्याची घटना घडली आहे. अशा घटना घडल्यावर काही तृत्तीय पंथीयांकडून खुलासा केला जातो. बातमी आली की निषेध केला जातो. तेव्हा पोलिसांनी वेळीच सावध होऊन उपाय केला नाही तर मोठी घटना घडल्याशिवाय राहणार नाही.
पुणे हटिया गाडीतील प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, गाडी क्रंमाक २२८४५ ही पुणे हटिया रेल्वे गाडी हटियाकडे जाताना काल गुरुवारी साधारण रात्री १२ वाजताच्या सुमारास वर्धा स्टेशनवर गाडी थांबली असता, सर्वात शेवटी असणार्या जनरल कोचमध्ये ६ जण चढले.रेल्वे गाडी सुरू होताच, टाळ्या वाजवत त्यांनी पैसे मागायला सुरूवात केली. एवढेच नव्हे तर प्रत्येकाने किमान ५०० रुपये द्यावे असे फर्मान त्यांनी सोडले, ज्या प्रवाशांनी नकार दिला. त्यांना बेदम मारहाण केली जात होती.
जवळपास दहा जणांना मारहाण झाल्याची माहिती आहे. एका महिलेने आपल्याजवळ पैसे नसल्याचे सांगताच तिची १ वर्षाची मुलगी त्यांनी हिसकावून घेतली, पैसे दे नाही तर या मुलीला घेऊन जाऊ, असे ते म्हणत होते, शेवटी अन्य प्रवाशांनी पैसे गोळा करून दिल्यावरच मुलीला सोडण्यात आले.जवळपास दीड तासपर्यंत या डब्यातील प्रवाश्यांनी हा थरार अनुभवला. रात्री दीड वाजताच्या सुमारास अजनी ते नागपूर दरम्यान गाडीचा वेग कमी होताच सर्व लुटारू उतरून पळून गेले, यापैकी एकाच्या हाती पिस्तूल होते. त्यामुळे घाबरून आम्ही विरोध केला नाही असे प्रवाशांचं म्हणणं आहे. रेल्वे पोलिस कशा पद्धतीने निगराणी करतात, हा कळीचा मुद्दा आहे.