अकोला दिव्य न्युज ब्युरो : अग्रवाल समाजाच्या सामाजिक सेवा कार्यात राज्यभर कार्यरत महाराष्ट्र राज्य अग्रवाल संमेलनच्या वतीने महानगरात शनिवार दिनांक 6 व 7 जानेवारी रोजी 26 व्या म रा अग्रवाल संमेलनाच्या वतीने अग्रवाल समाजाचे राज्यस्तरीय संमेलन होत असून यात अग्रवाल समाजाच्या ज्वलंत सामाजिक प्रश्नांवर मंथन होणार असून राज्यभरातील अनेक मान्यवर व चिंतक या संमेलनात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य संमेलनाच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली.
अग्रसेन भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत यावेळी संमेलनाचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार चौधरी, माजी आ. गोपीकिशन बाजोरिया, संमेलनाचे अध्यक्ष रमाकांत खेतान, स्वागताध्यक्ष सुशील खोवाल, कोषाध्यक्ष शैलेंद्र कागलीवाल, संमेलनाचे जिल्हाध्यक्ष दीपक गोयनका, एड सुरेश अग्रवाल गुरुजी, अग्रवाल महिला मंडळाच्या अध्यक्ष संतोष केडिया, नवयुवक मंडळाचे अध्यक्ष यश अग्रवाल, रितिक अग्रवाल सौ लता खिरवाल आदी मान्यवर उपस्थित होते.
हॉटेल ग्रँड जलसा येथे शनिवार दिनांक 6 जानेवारी रोजी संमेलनाचा प्रारंभ होणार आहे. यात वक्ते विजय शंकर मेहता हे युवकांना मार्गदर्शन करणार आहे. यावेळी होणा-या महिला चर्चासत्रात डॉ सुरभी घानावाला, द्वारका जालान, कविता अग्रवाल आदी सहभागी होणार आहेत. संमेलनाचे उद्घाटन राष्ट्रसंत हेमलता शास्त्री मथुरा तथा आचार्य वाघेश बनारस यांच्या हस्ते होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
रविवार 7 जानेवारीला द्वितीय सत्रात सत्कारमूर्तीत पवन कुमार सराफ पुणे, अँड.बी.जे अग्रवाल नागपूर, पन्नालाल बगडिया जालना, शिवप्रकाश रुहाटीया अकोला, शैलेंद्र कागलीवाल अकोला, अनिलकुमार अग्रवाल परतवाडा, गोपाल अग्रवाल आर्वी, डॉ सुरेश अग्रवाल जळगाव, गणेश अग्रवाल धुळे आदींना अग्रविभूषण व अग्रश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.यात अग्रवाल समाजाच्या महिला पुरुषांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी करण्यात आले.
या पत्रकार परिषदेत अशोक अग्रवाल कारंजा, अनिल अग्रवाल, आशिष अग्रवाल, संजय टिकूपोते, अशोक सोनालावाला, शैलेंद्र अग्रवाल, श्याम पोद्दार, नवल केडिया, रितेश चौधरी, गणेश अग्रवाल, सुनील अग्रवाल आदी उपस्थित होते.