Saturday, December 21, 2024
Homeगुन्हेगारीअकोला पोलिसांवर गोळीबार ! सुदैवाने शिपाई बचावले : अद्याप आरोपी फरार अन्...

अकोला पोलिसांवर गोळीबार ! सुदैवाने शिपाई बचावले : अद्याप आरोपी फरार अन् शोध सुरु

अकोला दिव्य न्युज : मध्यरात्री गस्तीवर असणाऱ्या पोलिसांवर कंचनपूर ते मांजरी दरम्यान अज्ञात इसमानी गोळीबार केल्याची घटना काल रविवारी उरळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडल्याने पोलिस प्रशासन व आसपासच्या परिसरात खळबळ उडाली आहे. उरळ पोलीस स्टेशनमधील हातरुणचे बीट जमादार दिनकर इंगळे आणि वाहन चालक मुंडे पोलिस वाहनात कंचनपूर ते मांजरी दरम्यान पेट्रोलिंग करत असताना कंचनपूरकडून दोन मोटरसायकल येत होत्या. मात्र मोटरसायकलस्वारांनी पोलिसांचं वाहन पाहताच आपल्या दुचाकी वळवून पळू लागले. इंगळेंना हे निदर्शनास येताच का पळ काढला ? हा विचार करून त्यांच्या पाठलाग करू लागले.

पोलिसांच्या ताब्यात येऊ हे लक्षात आल्याने मोटरसायकलस्वारांनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार सुरु केला. तेव्हा पोलिसांच्या वाहनाचे अंतर दुचाकी पासून शंभर मीटर पेक्षा अधिक असल्याने त्यांच्या बंदुकीचा निशाणा हुकला, अन् दोन्ही पोलीस कर्मचारी बचावले. यानंतरही गोळीबार करणाऱ्यांना पकडण्यासाठी दोन्ही कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केला. परंतु रस्ता खराब असल्यामुळे चारचाकी वाहन चालवण्यात अडचणीत होत्या. तरीही कंचनपूर पर्यंत त्यांचा पाठलाग सुरू ठेवला. दरम्यान एक रुग्णवाहिका सायरन वाजवत निघाली अन् मोटारसायकलस्वार पोलिसांच्या नजरेसमोरून गायब झाले.

घटनेचे गांभीर्य पाहता अकोला जिल्ह्या पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, बाळापूर उप विभागीय पोलीस अधिकारी गोकुळ राज हे उरळ पोलीस स्टेशन येथे तळ ठोकून बसले असून आरोपीचा शोध घेणे सुरु आहे. अकोला जिल्ह्यातील उरळ पोलीस स्टेशनचा परिसर संवेदनशील असून या परिसरातून गोवंश तस्करी तसेच पेट्रोलचा चोरटा व्यापार होत असल्याने पोलिसांना नेहमीच सतर्क राहावे लागते. अशा परिस्थितीत ही घटना घडली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!