नितेश भट्टड यांजकडून : डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त अमरावती येथे आयोजित कृषी प्रदर्शनातील उभी पिक, पशू , पुष्प प्रदर्शन, खाद्य बाजार व विविध सांस्कृतिक कार्यक्रम खास बाब आहे. मात्र या प्रदर्शनीमध्ये आकर्षणाचा केंद्र बिंदू असलेला ‘सुलतान’ रेडा सर्वांचा लक्ष वेधून घेत असून त्याची किंमत ५१ लाख एवढी आहे.सुलतान मुरराहा जातीचा रेडा आहे. या रेड्याची किंमत ऐकून सर्व थक्क झाले आहे. महाराष्ट्र शासन आयोजित महा पशुधन एक्स्पो २०२३ मध्ये सुलतान याचा देशात द्वितीय क्रमांक तर महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक आला आहे. सुलतानचे मालक पोपट श्रीधर गिरवले यांनी त्याची खूप काळजी घेतली आहे. या प्रदर्शनीचा उद्या शेवटचा दिवस आहे.
असा आहे दररोज सुलतानचा आहार
सुलतान याचा दररोजचा चारा ५ किलो ग्रॅम शेंगदाणा पेंड, १० लिटर दूध, अंडे, हिरवा चारा, उस, घास, मका आदी लागते. तर मुरराहा मादी दिवसाला २७ लिटर दूध देते. सुलतानचे वय ५ वर्ष ३ महिने आणि वजन ११०० किलो आहे.
लांब शिंगाची पंढरपुरी म्हैस वेधले लक्ष
पशु प्रदर्शनी विविध जातीच्या म्हशी, गाई व वळू याप्रदर्शनी मध्ये मुख्य आकर्षण आहे. लांब शिंगाची पंढरपुरी म्हैस, अतिशय सुंदर देखणे चपळ शर्यतीसाठी प्रसिद्ध असणारे पांढरा शुभ्र रंग अतिशय लांब धनुष्यबाणासारखे शिंग असलेली गायी व वळू प्रदर्शनीमध्ये मुख्य आकर्षण आहे.
३५ लिटर दूध देणारे होलस्टेन फ्रिसन
धिपाड देहवृष्टीचे शेती काम व दुधासाठी प्रसिद्ध असलेली लातूरची देवणी गाय व वळू प्रदर्शनीमध्ये मनमोहन टाकते. ३० ते ३५ लिटर दूध देणाऱ्या होलस्टेन फ्रिसन व जर्सी संकरित गायी या पशु प्रदर्शनीमध्ये दूध उत्पादन स्पर्धेत सहभागी झाले आहे.उत्तर भारतातील राठी, साहिवाल,पाकिस्तान सीमेवरची चोलीस्तानी गाईची जात पाहायला मिळेल. लाल कंधारी, खिल्लार, देवणी, गवळावू जातिवंत व उच्च दर्जाचे प्रजनन क्षमता असलेले वळू या प्रदर्शनीमध्ये पाहायला मिळेल.