Thursday, November 21, 2024
Homeगुन्हेगारीनागपूरच्या 'त्या’ महिलेने ३६ दिवस भोगल्या नरकयातना, तीन नराधम दररोज शोषण

नागपूरच्या ‘त्या’ महिलेने ३६ दिवस भोगल्या नरकयातना, तीन नराधम दररोज शोषण

अकोला दिव्य न्युज ब्युरो : यशोधरानगरातील दोन महिलांनी एका २६ वर्षीय विवाहित महिलेला काम मिळवून देण्याच्या नावाखाली तिची गुजरातमध्ये विक्री केली. महिलेच्या दोन्ही मुली हिसकावून घेण्यात आल्या. त्या महिलेवर तब्बल ३६ दिवस तीन भावंडांनी दिवसरात्र सामूहिक बलात्कार केला. नरकयातनेत जीवन कंठत असलेल्या महिलेची मानवी अनैतिक तस्करी विरोधी विभागाच्या प्रमुख रेखा संकपाळ यांनी सुटका केली. गुन्हे शाखेने सहा जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.

पीडित २६ वर्षीय महिला दीप्ती (काल्पनिक नाव) ही पती व दोन चिमुकल्या मुलीसह यशोधरानगरात राहते. आर्थिक स्थिती बिकट असल्यामुळे ती कामाच्या शोधात होती. तिचा पती मोलमजूरी करीत होता. मात्र, संसाराचा गाडा नीट चालत नसल्यामुळे त्याने मुंबईला कामासाठी गेला. दीप्ती ही मिळेल ते काम करून दोन्ही मुलींचा सांभा‌ळ करीत होती. दरम्यान, आरोपी नंदा पौनीकर आणि मंगला वरकडे यांच्याशी ओळख झाली. दोघींनी दीप्तीची आर्थिक बाजू हेरून तिला एका महिन्यांचा किराणा भरून दिला. त्यानंतर दोघींचेही वारंवार घरी येणे सुरु झाले. नंदा आणि मंगला यांनी महिलेला गुजरातमधील जामनगर शहरातमध्ये एका श्रीमंत कुटुंबातील लहान बाळाला सांभाळायचे काम असल्याचे सांगितले. त्यासाठी २० हजार रुपये वेतन देण्यात येणार असल्याचे सांगितले. तिने पतीची परवानगी घेऊन काम करण्यास होकार दिला.

नंदा आणि मंगला यांनी २५ जुलै रोजी दीप्तीला दोन्ही मुलींसह नागपूर रेल्वे स्थानकावर नेले. त्यांच्यासोबत १७ वर्षांच्या दोन अन्य मुली होत्या. त्यांनाही काम मिळवून देण्याचे आमिष दाखविण्यात आले होते. दीप्तीला गुजरातमध्ये पोहचल्यावर संतोष (४५) नावाच्या युवकाच्या घरी नेले. दीप्तीच्या दोन्ही मुलींना हिसकावून घेत तिला धमकी दिली. दीप्तीला संतोषच्या गळ्यात हार घालून लग्न लावण्याचा बनाव केला.

तिघांकडून दररोज सामूहिक शोषण
संतोषने दीप्तीला कुटुंबियांशी पत्नी असल्याची ओळख करून दिली. त्यानंतर पहिल्याच रात्री संतोष आणि त्याचे भाऊ गोलू (३२) आणि प्रतीक (३०) यांनी सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर सलग ३६ दिवस तिघांनी आळीपाळीने दीप्तीवर बलात्कार केला. तिने प्रतिकार करताच मुलीला जीवे मारण्याची धमकी देण्यात येत होती. तिघांच्या अमानवीय अत्याचाराला कंटाळून दीप्तीने एका शेजारी महिलेच्या मदतीने पळ काढून नागपूर गाठले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!