Thursday, November 21, 2024
Homeगुन्हेगारीभावाने केला बहिणीचा खून ! चारित्र्याच्या संशयावरून झाला वाद

भावाने केला बहिणीचा खून ! चारित्र्याच्या संशयावरून झाला वाद

अकोला दिव्य न्युज ब्युरो : चारित्र्याच्या संशयावरून मोठ्या भावाचा बहिणीसोबत शाब्दिक वाद झाला. वादाचे पर्यवसान मारहाणीपर्यंत पोहचले, अशातच भावाने बहिणीचा गळा दाबला आणि तिचा मृत्यू झाला. सदर घटना भंडारा तालुक्यातील वरठी लगतच्या सोनूली येथे घडली. वरठी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करून आशिष गोपीचंद बावनकुळे (२२) याला अटक केली आहे. अश्विनी बावनकुळे (२०) असे मृत बहिणीचे नाव आहे. भंडारा तालुक्यातील वरठी नजीकच्या सोनूली या गावात ही घटना उघडकीस आली.

सोनूली येथे गोपीचंद बावनकुळे आपल्या परिवारासह अनेक वर्षांपासून राहतात. ते एक मुलगा व मुलगी आणि पत्नी सोबत राहत असून आई वडील मोलमजुरी करतात. घटनेच्या दिवशी आई साकोली व वडील कन्हानला कार्यक्रमानिमित्त गेले होते. दरम्यान आशिष व त्याची बहीण अश्विनी दोघे घरी होते. दुपारी दोघात प्रेमप्रकरणावरून शाब्दिक वाद झाला. क्षुल्लक वादाचे पर्यवसान मारहाणीत झाले. वाद एवढा विकोपाला गेला की आशिषने अश्विनीच्या नाका-तोंडावर बुक्क्या हाणल्या. एवढ्यावरच न थांबता तिचा गळा आवळला. यात नकळत ती गतप्राण झाली. घटनेनंतर कुठेही वाच्यता न करता तो गावातच थांबून राहिला. आपल्या हातून घडलेले कृत्य लपविण्यासाठी त्याने लहान बहीण छतावरून पडल्याचे आईवडिलांना सांगितले. सायंकाळपर्यंत गावातही शुकशुकाट होता.

दरम्यान, पोलीस पाटीलांनी घटनेबाबत पोलिसांना सायंकाळी सूचना केली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी सामान्य रुग्णालयात हलवला. तो पर्यंत पोलिस यंत्रणा घटनेचा शोध घेण्यास कामाला लागली. गळ्यावर दाबल्यागत खुणा दिसत असल्याने पोलिसांनी तपासाची गती वाढवली व आशिषला विचारपूस केली. यावेळी तो पोलिसांसोबत दवाखान्यात होता. शवविच्छेदन अहवालात सर्व उघड होण्याची कल्पना येताच त्याने रात्री दवाखान्यातच खुनाची कबुली दिली. पोलिसांनी या प्रकरणी भादंवि ३०२ अन्वये गुन्हा नोंद करून आशिषला ताब्यात घेतले. गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक अभिजित पाटील व उपनिरीक्षक महेंद्र शहारे, हवालदार विनायक बेदरकर करीत आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!