Thursday, November 21, 2024
Homeसंपादकिय'इंडिया’तील जागावाटप कोठेही गुंतागुंतीचे नाहीच ! नेमक्या रणनीतीला रंगरूप मिळण्याचे संकेत

‘इंडिया’तील जागावाटप कोठेही गुंतागुंतीचे नाहीच ! नेमक्या रणनीतीला रंगरूप मिळण्याचे संकेत

गजानन सोमाणी • एडिटर इन चीफ : हिवाळी अधिवेशनामध्ये मोदी सरकारने ‘इंडिया’तील खासदारांना निलंबित करून सर्वांना एकत्र येण्यासाठी मोठी चालना दिली आहे. जंतर-मंतरसह संपूर्ण भारतभर झालेल्या आंदोलनातही ‘इंडिया’तील तमू घटक पक्षांचे नेते वा त्यांचे प्रतिनिधी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.इंडिया आघाडी गठीत होतं असताना, अनेक तर्ककवितर्क कथा, वावडया, आणि राजी-नाराजीचे नाटय रंगवले जात होते. मात्र इंडिया आघाडी अस्तित्वात आली.

हिमाचल प्रदेश व कर्नाटक या राज्यात दोन बैठका पार पडल्यानंतर मुंबईत झालेल्या ‘इंडिया’च्या बैठकीला मुंबईतील उपस्थित सगळेच नेते आले होते. दरम्यान पांच राज्यातील विधानसभा निवडणुकीत तेलंगणा वगळता तीन राज्यात कॉग्रेस पक्षाच्या पराभवानंतर पुन्हा तीच ‘रिघ’ ओढल्या जाऊ लागली, मात्र १९ डिसेंबरला झालेल्या बैठकीनंतर ‘इंडिया’ मधील लालूप्रसाद यादव आणि नितीश कुमार यांच्या ‘राजीनाराजी’ बाबत वावड्या उठल्या गेल्या. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी जनता दलाचे (सं) प्रमुख नितीशकुमार यांच्याशी संवाद साधल्यापासून ‘इंडिया’मध्ये काही तरी बिनसले असल्याची चर्चा केली जात आहे. त्याचा संबंध ममतांच्या प्रस्तावाशी जोडला जाऊ लागला आहे. खरगेंचे नाव घेतल्यामुळे नितीशकुमार नाराज असल्याचे बोलले जात आहे.

मोदींविरोधात खरगेंचा चेहरा असेल तर दक्षिण-उत्तर विभाजन होऊन भाजपला त्याचा उत्तरेत दणदणीत लाभ मिळेल असे मानले जात आहे. मोदीविरोधात लढण्यासाठी हिंदी पट्टयातील नेता हवा, तो नितीशकुमारच असू शकतील, ही उपकथा आहे. या कथा-उपकथेत आणखी एक पिल्लू ममतांनीच सोडून दिलेले आहे. वाराणसीमध्ये मोदींविरोधात प्रियंका गांधी-वाड्रा ‘इंडिया’कडून योग्य उमेदवार ठरू शकतील असाही मुद्दा ‘इंडिया’च्या बैठकीत उपस्थित झाला होता.

‘इंडिया’च्या बैठकीनंतर कथा-उपकथा रचल्या जात आहेत. पण, खरा मुद्दा जागावाटपाचा असून ‘इंडिया’मध्ये याच मुद्दयावरून गदारोळ चालू आहे. असे वातावरण निर्माण केल्या जात आहे. मात्र संसदेच्या खासदारांच्या निलंबनानंतर हा जोड अधिक मजबूत दिसत असल्याने जागावाटप कोठेही गुंतागुंतीचे नाही.तर पुढील दोन आठवडय़ांच्या कालावधीत ‘इंडिया’च्या रणनीतीला रंगरूप मिळण्याचे संकेत दिसत आहे.

‘इंडिया’मध्ये जागावाटपाचा खरा प्रश्न महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, दिल्ली, पंजाब, बिहार आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये असेल. तरीही महाराष्ट्रात महाविकास आघाडीमध्ये ३०-३५ जागांबाबत मतभेद नसल्याचे सांगितले जाते. उर्वरित जागांवर रस्सीखेच सुरू असून त्यावर मल्लिकार्जुन खरगे, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यातील चर्चेतून तोडगा काढला जाऊ शकतो. महाराष्ट्रातील जागा वाटपावर एकमताने निर्णय झाल्यात जमा आहे.

महाराष्ट्राचा प्रश्न सुटला असून कॉंग्रेसला दिल्ली आणि पंजाबमधील जागावाटपाचा पेच तातडीने सोडवावा लागेल. अन्यथा काँग्रेसला पुन्हा पंजाबवर पाणी सोडावे लागेल. पंजाबमधील विधानसभा निवडणुकीवेळी झालेला घोळ काँग्रेस टाळू शकेल. पंजाबमध्ये सत्ता आपकडे असली तरी, तिथे काँग्रेस अजूनही मजबूत आहे. त्यामुळे काँग्रेसने सर्वच्या सर्व १३ जागा लढवण्याचा निर्णय घेतला तर दिल्लीत ‘आप’ला अधिकार दिले जाईल. भाजपला फायदा मिळू शकेल, अशी कोणतीही चूक खरगे, शरद पवार करु देणार नाही. दिल्लीत ‘आप’ने पांच आणि काँग्रेसने दोन जागा वाटून घेतल्या तर,पंजाबमध्येही जागावाटपाचे सूत्र याचं सूत्राने होईल. मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणुकीत कमलनाथ यांनी दाखवलेला उद्दामपणा पंजाबमध्ये दाखवला तर गणित फिसकटू शकते. मात्र ममता बॅनर्जी यांच्या प्रस्तावाला केजरीवाल यांनी समर्थन करुन एक पाऊल पुढे टाकले असल्याने कॉंग्रेसही जास्त ताणून घेणार नाही,

इंडिया’साठी महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालनंतर महत्त्वाचे राज्य म्हणजे बिहार. इथे जनता दल (सं) आणि राष्ट्रीय जनता दलाच्या वाटणीमध्ये काँग्रेसच्या पदरात पडलेल्या जागांची संख्या अल्पच असेल. पश्चिम बंगालमध्ये नवी उपकथा तयार होऊ लागल्याचे सांगितले जाते. इथे काँग्रेस व माकप यांची युती असून ‘माकप’ने तृणमूल काँग्रेसला सोबत घेऊन जागावाटपाचा प्रस्ताव फेटाळला आहे. डावे पक्ष व काँग्रेस आघाडीने एकत्रितपणे तृणमूल व भाजपविरोधात लढले पाहिजे, असा ‘माकप’चा आग्रह आहे. या युतीतून काँग्रेसने बाहेर पडून तृणमूल काँग्रेसशी जागावाटपाच्या वाटाघाटी केल्या तर, इथे नवे गणित मांडले जाईल. तसे झाले नाही तर, पश्चिम बंगालमध्ये तिहेरी लढत होईल.

आता राहिला उत्तर प्रदेश. इथे समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांची नाराजी दूर करून काँग्रेसला जागावाटप यशस्वी करावे लागणार आहे. अलिकडे मायावती यांचा बदलेला सूर आणि “अभी नहीं तो कभी नहीं” ची सर्वांना पुरेपूर कल्पना असल्याने उत्तर प्रदेशातील जागा वाटप लालूप्रसाद यादव, शरद पवार, नितीशकुमार व फारुख अब्दुल्ला यांच्या कलाकलाने होईलच, एकंदरीत युपी वगळता ‘इंडिया’तील जागावाटप कोठेही गुंतागुंतीचे नाही. असं आजचे चित्र आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!