अकोला दिव्य न्युज ब्युरो : बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयच्या स्त्री रुग्णालयाचे प्रमुख वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन वासेकर यांना 48 हजार रुपयांची लाच घेतांना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले. डॉ. वासेकर यांना ताब्यात घेतले असून, त्यांचावर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहे. विशेष म्हणजे करोना काळात उल्लेखनीय काम केल्याबद्दल त्यांना पुरस्कृत देखील करण्यात आले होते. पण लाच घेतांना पकडल्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे.
धाड नाक्यावर एका हॉटेलमध्ये एका कंत्राटी डॉक्टरकडून ४८ रुपये रोख स्वरूपात लाच घेतांना डॉ.वासेकर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने टाकलेल्या जाळ्यात ओढले गेले. डॉक्टरची ड्युटी लावण्यावरून डॉ. वासेकर सतत पैश्यांची मागणी करायचे. यासंदर्भात त्यांच्या काही रेकॉर्डिंग आणि इतर पुरावे गोळा झाल्यावर सदर कार्यवाही एसीबीच्या धडाकेबाज dysp शीतल घोगरे यांनी यशस्वीपणे पूर्ण केली.
डॉ. वासेकर यांनी कोरोना काळात उल्लेखनीय काम केले होते. अलिकडे लाच घेण्याचे प्रमाण वाढत चालले आहे, यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे.मात्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याविरोधात तक्रार करण्याचे प्रमाण कमी आहे. यावर गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे.