अकोला दिव्य न्युज ब्युरो : आपल्या देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी आपण आपली कर्तव्ये समजून ‘आपण करू शकतो’ ही भावना ठेवून ती पूर्ण करण्यावर भर द्यायला हवा. युवा शक्ती ही देशाच्या प्रवाहाला गती देणारी ऊर्जा असून, पुरुषांच्या बरोबरीने सर्व क्षेत्रात महिलांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. त्यामुळे आजच्या तरुणींवर मोठी जबाबदारी आली आहे. युवा असणे म्हणजे, आपल्या प्रयत्नांमधे गतिशील असणे, युवा असणे म्हणजे व्यापक दृष्टिकोन असणे. युवा असणे म्हणजे व्यवहाराचे भान असणे, हे लक्षात घेऊन अकोला शहरातील ‘साई गर्ल्स हॉस्टेल’च्या संचालकांकडून युवतींना भविष्यातील संधी व जबाबदारीची सातत्याने जाणीव करून दिली जाते.
शतक भारताचे शतक आहे, हे शतक तुमचे शतक आहे, हे शतक भारतातील युवकांच्यासोबत युवतींचंही शतक आहे. आपण जगात सकारात्मक उलथापालथी घडवणे आणि विकसित देशांच्याही पुढे जाणे अतिशय आवश्यक आहे.नेमके हाच धागा पकडून व
स्वामी विवेकानंद यांचे ‘संस्था आणि नवोन्मेष सर्व युवकांच्या आयुष्याचा भाग असले पाहिजेत. या उद्देशाने शिक्षणासाठी अकोला शहरात येणाऱ्या मुलींना हक्काचं घर (हॉस्टेल) देण्यात अग्रभागी असलेल्या ‘साई गर्ल्स हॉस्टेल’ कडून प्रखर वक्त्ता पुषेंद्र कुलश्रेष्ठ यांचे व्याख्यान आयोजित केले आहे. स्थानिक L R T. महाविद्यालयाच्या सभागृहात आज रविवार २४ डिसेंबरला रात्री ८ वाजता, आजची परिस्थिती “भारताचं भविष्य बनविण्यासाठी युवतींची जबाबदारी” या विषयावर कुलश्रेष्ठ मार्गदर्शन करणार आहेत. हा कार्यक्रम फक्त महिला व युवतींसाठी आयोजित करण्यात आला असून, महिला व तरुणींना मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन मुलींना अकोला शहरात “घरपण” देण्यात अग्रभागी ‘साई गर्ल्स हॉस्टेल’च्या संचालिका अनुराधा आशिष बाहेती यांनी केले आहे.