अकोला दिव्य न्युज ब्युरो : भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागातर्फे दरवर्षी प्रमाणे यंदाही राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.यंदा नाशिक येथे नुकत्याच पार पडलेल्या 31 व्या राज्यस्तरीय बालविज्ञान परिषदेमध्ये प्रभात किड्स स्कूलच्या दोन विज्ञान प्रकल्पांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.
इयत्ता सातवीच्या अनय पंकज बाछुका व आरना अलानी यांनी ’जलपर्णीपासून कागदाची निर्मिती‘ हा प्रकल्प विज्ञान शिक्षिका वर्षा वाकोडे यांच्या मार्गदर्शनात तसेच इयत्ता आठवीच्या वेदांत गडोदिया व प्रणिल नावकार यांची ’मत्सालयातील सांडपाण्याचा झाडांच्या वाढीवर परिणाम‘ हा प्रकल्प विज्ञान शिक्षक अमित जोशी यांच्या मार्गदर्शनात यशस्वीपणे सादर केला. विज्ञान विभागप्रमुख मिता इंगळे, उपप्रमुख वैशाली जोशी तसेच बालविज्ञान परिषद जिल्हा समन्वयक स्नेहल पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
प्रभातचे संचालक डॉ. गजानन नारे, संचालिका वंदना नारे, सचिव निरज आवंडेकर, प्राचार्य वृषाली वाघमारे व उपप्राचार्य अर्चना बेलसरे यांच्यासह शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचार्यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे असून पुढील स्पर्धेकरीता शुभेच्छा दिल्या.