अकोला दिव्य न्युज ब्युरो : मराठा समाजाला आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांनी सरकारला २४ डिसेंबरचा अल्टिमेटम दिला आहे. ही तारीख जवळ आल्याने आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्याकरता मनोज जरांगे यांनी आज रविवार १८ डिसेंबरला मराठा समाजाची अंतरवली सराटी येथे बैठक बोलावली आहे. आजची बैठक दिशा दर्शक बैठक ठरणार आहे.
आज रविवार होऊ घातलेल्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने त्यांचं शिष्टमंडळ मनोज जरंगे यांच्या भेटीसाठी काल शनिवार १६ डिसेंबरला पाठवले होते. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आणि रोहयो मंत्री सदीपान भुमरे यांनी जारांगेंची भेट घेतली. या भेटीत त्यांनी २४ डिसेंबरची मुदत वाढवून देण्याची मागणी केली आहे. सरकार दोन पातळ्यांवर काम करत आहे. आम्हाला कायमस्वरूपी आरक्षण द्यायचं आहे. कुठेही घाईत निर्णय घ्यायचा नाही. कायदेतज्ञ मराठा आरक्षणावर अभ्यास करत आहेत. हक्काचं आरक्षण निश्चित मिळणार आहे. २४ डिसेंबरचा आग्रह मनोज जरांगे-पाटलांनी सोडावा, अशी विनंती गिरीश महाजन यांच्याकडून करण्यात आली आहे.
सरकारच्यावतीने दोन मंत्री इथे आले होते. त्यांच्याबरोबर मी मीडियाच्या माध्यमातून जाहीर चर्चा केली. अंधारात चर्चा केलेली नाही. मराठा समाजाची (आज) प्रचंड मोठी आणि निर्णायक बैठक होणार आहे. २४ डिसेंबरपर्यंत मराठ्यांना आरक्षण नाही दिलं तर मराठा आंदोलनाची पुढची दिशा काय? या संदर्भात घराघरातील मराठा बांधव येणार आहेत. याबाबत सविस्तर सकाळी ९ ते दुपारी ३ पर्यंत चर्चा होणार आहे. सुरुवातीलाच ओळख बैठक होणार आहे. सगळ्यांचा परिचय करून दिला जाईल. त्यानंतर दुपारी १२ वाजता मुख्य बैठकीला सुरुवात होईल, अशी माहिती मनोज जरांगे यांनी टीव्ही ९ मराठीला दिली.
माजलगावमधील मुलं शिकवण्यासाठी बाहेर गावी आहेत. तरीही, पोलीस त्यांच्या घरी गेले होते. शाहगड आणि अंतरवालीच्या बाबातही तेच चालू आहे. आमच्याशी दगफटका झाला आहे. तुम्ही सगळ्यांना अटक करणार असल्याचं आम्ही धरून चाललो आहे. पण, आमच्याशी धोका झाला आहे. गुन्हे मागे घेण्याचं आश्वासन देऊनही आमच्या लोकांना विनाकारण अटक करण्यात आली आहे”, असं काल (१६ डिसेंबर) गिरीश महाजनांची भेट घेतल्यानंतर जरांगे पाटील म्हणाले.
अंतरावालीतील गुन्हे मागे घेण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. पण, तीन महिने झालं, अद्यापही घेण्यात आले नाहीत. तुमचे शब्द मराठा समाजानं मोडायचे नाही. पण, आमच्या एक-एक जणाला अटक करण्यात येत आहे. सगळ्यांना नोटीस पाठवण्यात येत आहे. कशी तुमच्याशी चर्चा करायची? असा सवाल जरांगे-पाटलांनी गिरीश महाजनांना विचारला.