Sunday, December 22, 2024
Homeसामाजिकसुमिरमा फाउंडेशनतर्फे रविवारी अभिनेते भाऊसाहेब शिंदेंच्या हस्ते सेवाभावी कार्यकर्त्यांचा गौरव

सुमिरमा फाउंडेशनतर्फे रविवारी अभिनेते भाऊसाहेब शिंदेंच्या हस्ते सेवाभावी कार्यकर्त्यांचा गौरव

अकोला दिव्य न्युज ब्युरो : वैद्यकीय व सामाजिक सेवेत कार्यरत सुमिरमा फाउंडेशनच्यावतीने संस्थेचा द्वितीय वर्धापन दिनानिमित्त गौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. राष्ट्रीय अवॉर्ड प्राप्त सिने अभिनेते भाऊसाहेब शिंदे यांच्या उपस्थितीत प्रसिद्धी पासून दूर असणाऱ्या सेवाभावी कार्यकर्त्यांचा गौरव करण्यात येणार आहे.अशी माहिती सुमिरमा फाउंडेशनच्या अध्यक्ष व नेत्रतज्ञ डॉ. पूजा रमाकांत खेतान यांनी दिली.

आज वेलकम इन सभागृहात संपन्न झालेल्या पत्रकार परिषदेत फाउंडेशनच्या सेवाभावी कार्याची माहिती देण्यात आली. यावेळी संस्थेचे मार्गदर्शक व ज्येष्ठ उद्योजक रमाकांत खेतान, फाउंडेशनचे कार्यवाह आशिष खिल्लारे, विशाल धांडे मंचावर उपस्थित होते. रविवार दिनांक 17 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता माहेश्वरी भवन येथे फाउंडेशनचा द्वितीय वर्धापन सोहळा होत असून यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून आ.रणधीर सावरकर, माजी आ.गोपीकिशन बाजोरिया, आ.वसंत खंडेलवाल, माजी राज्यमंत्री अजहर हुसेन,
माजी राज्यमंत्री डॉ.रणजीत पाटील, आ.अमोल मिटकरी, माजी महापौर मदन भरगड, माजी महापौर विजय अग्रवाल, काँग्रेस नेते बबनराव चौधरी, डॉ.अभय पाटील, मनपा नेते साजिद खान पठाण, महानगर काँग्रेसचे अध्यक्ष डॉ प्रशांत वानखडे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संग्रामदादा गावंडे, महिला काँग्रेस अध्यक्ष पूजा काळे, डॉ जीशान हुसेन, सेना नेते राजेश मिश्रा, नगरसेविका उषा विरक, गोपी ठाकरे, डॉ अशोक ओळंबे आदि मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे.

या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे रौदळ, ख्वाडा, राजकुमार, हैदराबाद कस्टडी आदी चित्रपटात भूमिका केलेले सुपरस्टार भाऊसाहेब शिंदे हे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे. सेवाभावी डॉ पूजा खेतान यांच्या नेतृत्त्वाखाली समाजातील तळागाळात आपली वैद्यकीय व सामाजिक सेवा अविरतपणे करीत असून फाउंडेशनने करोना काळातही उत्कृष्ट सामजिक व वैद्यकीय सेवा बजावून अनेक रुग्णांना जीवदान दिले आहे. राष्ट्रीय व सामाजिक पर्वात फाउंडेशनने अनेक उपक्रम राबविले आहे. यामध्ये रोगनिदान शिबिरे, नेत्र तपासणी शिबिरे, रुग्णांना भोजनदान, पुनर्वसन, वैद्यकीय सहाय्य करण्याचा हा वसा फाउंडेशनने सातत्याने जोपासला आहे.

मानव सेवा हेच ब्रीद असून या सेवाभावी सेवेसाठी डॉ पूजा खेतान यांचा अनेक संस्थांच्या वतीने गौरव करण्यात आला आहे.या द्वितीय वर्धापन दिनावर फाउंडेशनने अभिनव उपक्रम साकार केला आहे. प्रसिद्धीपासून दूर असलेले मात्र अहोरात्र शिक्षण, साहित्य, आरोग्य,सामाजिक सेवेत रममाण असून सेवेचा वसा धारण केलेल्या कार्यकर्त्यांची पडताळणी करून त्यांचा बहुमान करण्याचे ठरविले आहे.

त्या अनुषंगाने खेळाला नवा आयाम देणारे सतीशचंद्र भट, बुद्धिबळपटू संस्कृती वानखडे, कुस्तीपटू खुशी श्रीनाथ, आचल श्रीनाथ, महेंद्र सुतार, मालती भदे तर दिव्यांग सेवा कार्य करणारे प्रा. विशाल कोरडे, वाहेगुरू संस्थान, महिला पोलीस अनिता वरघट, बाल कल्याण समितीच्या प्रांजली जयस्वाल, अँड. देवेंद्र अग्रवाल, जागर फाउंडेशन, शासकीय अभियोक्ता शितल राऊत, गोरगरिबांना पुरी भाजी देणारे सुनील दुर्गिया, शिक्षण क्षेत्रातील प्रा फडके सर, प्रा एम एफ खान, प्रा अभिजीत मुळे, कलाक्षेत्रातील ज्येष्ठ कलावंत वसंत मानवटकर, तबलावादक विनू शुक्ला, श्री मूर्तीचे कलाकार टिल्लू टावरी, रंगमंच कलाकार आरती उनवणे, केबीसी मध्ये नाव प्राप्त केलेल्या शिल्पा मेश्राम समवेत अनेक मान्यवरांचा गौरव करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

या सोहळ्याची जोरदार तयारी फाउंडेशनच्या वतीने करण्यात आली असून महानगराच्या शिरपेचात आपल्या कलेने मानाचा तुरा होणाऱ्या या कलावंतांचा गौरव करण्यासाठी अकोलेकर महिला पुरुष नागरिकांनी या सोहळ्यात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले. पत्रकार परिषदेत फाउंडेशनचे सेवाभावी कार्यकर्ते नितीन भोंडे, सोनू ठाकूर, संजय ठोके, लोकेश शर्मा, विनोद इंगळे, सागर पाटील, भावना अग्रवाल, अश्विनी परदेशी, शिवानी राजुरकर, विकी मोरे, प्रमोद जाधव, तेजस मोरे, प्रशांत जाधव, आनंद गवळी, सुरज हिवाळे, आशिष देशमुख आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!