अकोला दिव्य न्युज ब्युरो : प्रत्येक स्त्री विशिष्ट असून तिच्यात काही विशिष्ट गुणांचा समुह असतो.या गुणांना ओळखूण, त्या गुणांना वाव देऊन या गुणांच्या मदतीने स्वतःचा, समाजाचा आणि देशाचा आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक विकास साध्य करण्याची गरज आहे. ती एकत्र येण्यास व त्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होण्याच्या उद्देशाने शहरातील खंडेलवाल महाविद्यालयातील पद्मानंद सभागृहात रविवार दि 17 डिसेंबर 2023 रोजी सकाळी साडेनऊ ते दुपारी 3 वाजेपर्यंत अजेय महिला शक्ती संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
देशभरात आयोजित करण्यात आलेल्या जवळपास 400 संमेलन पैकी एक महत्त्वाचे संमेलन अकोला शहरात 17 डिसेंबरला होत असून या संमेलनाच्या निमित्ताने या ठिकाणी वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम, चर्चासत्र, वस्तूंच्या विक्री व प्रदर्शनाचे स्टॉल्स आणि लघु उद्योजकांचे स्टॉल्स राहणार आहेत. समेलनाच्या आयोजीका आरती लढ्ढा तर सहसंयोजीका सरिता शर्मा, कांचन हरणे, सुजाता मुलमुले मूर्तिजापूर व कोमल चिमणकर तेल्हारा या आहेत. चित्रा बापट आणि लता किडे प्रमुख मार्गदर्शक आहेत .
देशभरात आयोजित करण्यात आलेल्या जवळपास 400 संमेलन पैकी एक महत्त्वाचे संमेलन अकोला शहरात 17 डिसेंबरला होत असून या संमेलनाच्या निमित्ताने या ठिकाणी वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम, चर्चासत्र, वस्तूंच्या विक्री व प्रदर्शनाचे स्टॉल्स आणि लघु उद्योजकांचे स्टॉल्स राहणार आहेत.
संमेलनाचे मुख्य आकर्षण म्हणजे तीन महत्त्वपूर्ण सत्र आहेत. ज्यामध्ये सामाजिक,आर्थिक , शैक्षणिक, स्वास्थ, महिला सुरक्षा इत्यादि विविध क्षेत्रातील तज्ज्ञ मान्यवरांचे मार्गदर्शन अकोला शहरातील महिलांना मिळणार आहे अतिशय नाविन्यपूर्ण कल्पना आणि महत्त्वपूर्ण उपक्रमाचा समावेश असलेले आयोजन सर्वांसाठी निःशुल्क आहे. अकोला शहरात पहिल्यांदा आयोजित सम्मेलनाचा लाभ अकोल्यातील सर्व महिलांनी घ्यावा असे आवाहन संयोजिका आरती लढ्ढा यांनी केले आहे.