अकोला दिव्य न्युज ब्यूरो : अकोला शहरातील मालमत्ता कर वसुली मोठ्या प्रमाणात आणि सुरळीतपणे सुरू असताना, अकोला महापालिका आयुक्त व प्रशासक यांनी भारतीय जनता पक्षाच्या दबावात स्वाती कंपनीला मालमत्ता कर वसूलीचा ‘ठेका’ दिला आहे. यासाठी नियमित होत असलेल्या वसुलीतून चक्क ८ टक्के स्वाती कंपनीला देण्यात येणार आहे. ही अकोलेकरांची लूट सुरू केली आहे. तेव्हा अकोलेकरांनी स्वाती कंपनीच्या कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचारी यांना कर देऊ नये. सरळ मनपाच्या कर विभागात जमा करावे, असे आवाहन शिवसेना (ठाकरे) कडून करण्यात आले आहे.
अकोला शहरवासीयांना यासाठी जागृत करण्यासाठी आज जनजागृती अभियान राबविण्यात आले. आराध्य दैवत राजराजेश्वर महाराज मंदिरातून हे अभियान सुरू करण्यात आले. जय हिंद चौक, मोठे पुल, मोठे राम मंदिर, जुने कापड बाजार, सराफ बाजार, कुंभार वाडा, जाजू मार्केट, दाना बाजार, खेतान गल्ली, लोहा बाजार, गांधी चौक, तहसील चौक, चौपाटी, कोठडी बाजार, न्यु क्लॉथ मार्केट, काळा चबुतरा, ओपन थेटर, तिलक रोड, अलंकार मार्केट इत्यादी परिसरातील व्यापारी लोकांना भेटून मनपा मालमत्ता टॅक्स वसुली खाजगी कंत्राटाबाबत जनजागृती करण्यात आली.
यावेळी शिवसेना पश्चिम शहर प्रमुख राजेश मिश्रा, अकोला पूर्व शहर प्रमुख राहुल कराळे, विकास पागृत, मुकेश मुरुमकार, अतुल पवनीकर, गजानन बोराळे, तरुण बागेरे, अभय खुमकर, जोत्स्ना चोरे, सुनीता श्रीवास, मंजुषा शेळके, शुभांगी किंनगे, वर्षा पिसोडे, विशाल घरडे, नितीन मिश्रा, नितीन तठोड, ज्ञानेश्वर गावंडे, नितीन ताकवाले, अनील परचुरे, आशुतोष शेगोकार, बाळू ढोले पाटील, शरद तूरकर, किरण ठाकरे, मोंटू पंजाबी, प्रकाश वानखडे, किरण येलवणकर, अंकुश सित्रे, बबलू उके, सागर कुकडे, आकाश राऊत, निवृत्ती तिजारे, रामेश्वर पडुळकर, सतीश नागदिवे,अक्षय नागापुरे,रुपेश ढोरे,राजेश इंगळे, रोशन राज, शुभम इंगळे, जय इगोले, अभिजित शिंदे, शैलेश अंदुरेकर, मनोज बाविस्कर,संतोष रणपिसे, छोटू धुर्वे, रवी अवचार, गणेश पोलाखडे, विश्वास शिरसाट,
देवा गावंडे, रुद्राक्ष राठोड, गणेश मालटे, प्रमोद धर्माळे, दीपक माटे, छोटू पाटील,आशु तिवारी, संतोष टापरे,अजय भटकर,सुरेश इंगळे, श्याम रेडे, गणेश बुंदले, गोपाल लवाळे, गोपाल बिलेवार, अर्जुन शिरसागर, संजय अण्णा, मंगेश पावले, योगेश कटियारमल, आशिष इंगळे, गोटू माडेवे, प्रमोद माने, रवी गायकवाड, राधे श्रीवास, दशरथ मिश्रा, भगवान गायकवाड, पवन शाईवाले, मंगेश ढवळे, रवी मडावी, नीलिमा तिजारे, रुक्मणी जाधव, राखी पटेकर, इंगळेताई, रंजना हरणे, वर्षा पिसे, लिलाबाई देव यांच्यासोबत मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.