अकोला दिव्य न्युज ब्युरो : जिल्ह्यातील मर्म स्थळ अतिसंवेदनशिल बी.पी.सि.एल. डेपो गायगाव येथे अचानक आग लागल्यावर काय कारवाई करावी, याबाबत पोलीस दलातर्फे आज फायर मॉक ड्रीलची रंगीत तालीम घेण्यात आली.
आज सोमवार 4 डिसेंबर रोजी अकोला जिल्हयात भविष्यात मर्म स्थळ अतिसंवेदनशिल बी.पी.सि.एल. डेपो गायगाव येथे अचानक आग लागल्यावर त्या अनुषंगाने कोणकोणत्या उपायायोजना व कार्यवाही करण्यात येईल त्या कार्यवाहीबाबत अकोला जिल्हयात पो.स्टे. उरळ हद्दीतील ग्राम गायगाव येथील मर्म स्थळ अतिसंवेदनशिल बी.पी.सि.एल. डेपो येथे पोलीस अधीक्षक संदिप घुगे यांनी नाटयमय रंगीत तालीमीवे (फायर ड्रील) आयोजन केले होते.
या नाट्यमय कार्यवाहीत मर्म स्थळ अतिसंवेदनशिल बी.पी.सि.एल. डेपो गायगाव येथे अचानक आग लागल्याबाबत पोलीस दलास माहिती प्राप्त झाल्यावर पोलीस दलाकडुन तात्काळ सदरची माहिती अग्नीशमन दल, महानगर पालीका अकोला व ॲम्बुलन्स यांना देवुन घटनास्थळी तात्काळ अग्नीशमन वाहन बोलावुन घेवुन आगीवर नियंत्रण मिळविले. त्या दरम्यान पोलीसांनी जिवीतहानी व मालमत्तेची हानी होवु नये याकरिता रोडवर डेपोच्या दोन्ही बाजुंनी येणारी-जाणारी वाहतुक थांबवुन तसेच आजुबाजुच्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवुन जिवीत व मालमत्तेचे हानी होवु दिली नाही.
ही फायर ड्रिल पोलीस अधिक्षक संदीप घुगे यांच्या उपस्थितीमध्ये घेण्यात आली. या ड्रील मध्ये बी.पी.सि.एल. चे अखिलेश शाहु, संजय कुमार, विवेक शर्मा, एच.पी.सि.एल. चे लोकेश कुमार, आयोसिलचे मनिष प्रताप, सागर शर्मा व पो.स्टे. उरळचे ठाणेदार गोपाल ढोले यांनी सहभाग घेतला.