Thursday, November 21, 2024
Homeसांस्कृतिक3000 महिलांच्या सहभाग ! एक लक्षवेळा सामुहिक श्रीरामरक्षा पठण : अडॅ...

3000 महिलांच्या सहभाग ! एक लक्षवेळा सामुहिक श्रीरामरक्षा पठण : अडॅ धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्पाचा उपक्रम

अकोला दिव्य न्युज ब्युरो : असंख्य भारतीयांचे हृदयसिंहासनावर विराजमान असणाऱ्या श्रीरामचंद्रांच्या भव्य मंदिराचे अयोध्येत २२ जानेवारी उद्धघाटन होणार आहे. या अनुषंगाने अँड.धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्प द्वारे 3 हजार महिलांच्या सहभागासह, एक लक्षवेळा श्रीराम रक्षा पठणाचा सामूहिक कार्यक्रम बिर्ला राम मंदिर जठारपेठ येथे आयोजित केला आहे.
श्रीरामरक्षा या शब्दाचा अर्थ रक्षणकर्ता राम असा आहे. प्रभु रामचंद्रांना ‘मर्यादा पुरुषोत्तम‘ असे म्हणतात. प्रभु रामचंद्रांनी राजा, पिता, बंधू, पति या सर्व नात्यांनी मर्यादा सांभाळून एक फार मोठा आदर्श घालून दिला आहे. बुधकौशिक ऋषिंच्या स्वप्नात जाऊन प्रत्यक्ष प्रभु रामचंद्रांनीच रामरक्षा हे स्तोत्र रचण्यास सांगितले आहे. त्यामुळे रामरक्षा स्तोत्रा तील प्रत्येक अक्षर हे मंत्रमय व तारक असे आहे.
रामनाम घेत असताना लक्ष नामावर स्थिर झाले की मन लक्ष+मन= लक्ष्मण होते. नामस्मरण करता-करता मन उन्मन होते म्हणजेच हनुमान होते. हनुमान झालेले हे मन भक्ती मध्ये रत झाले की भरत होते. असे मन सततच्या नामस्मरणा मुळे तृप्त होते, त्यातील विकार नाहीसे होतात, शत्रुंचे हे मन हनन करते म्हणून ते शत्रुघ्न होते. अशा नामस्मरणाने मन शांत होते शीतलता प्राप्त करते म्हणजेच सीता होते.
श्री रामाच्या उपासनेत श्री राम रक्षा स्तोत्र हे एखाद्या ढालीसारखे कार्य करतात. याचे रोज पठण केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतात आणि त्याला सुख, समृद्धी आणि सौभाग्य प्राप्त होते. जो कोणी पूर्ण भक्ती आणि श्रद्धेने श्री रामरक्षा स्तोत्राचा पठण करतो, त्याला भगवान रामाच्या कृपेने आणि आशीर्वादाने मोठी संकटे आणि आजार देखील स्पर्श करु शकत नाहीत
रामरक्षा स्तोत्राच्या शुभ प्रभावामुळे, एखाद्या व्यक्तीला आयुष्यात कधीही ज्ञात अज्ञात शत्रूची भीती वाटत नाही. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सिद्ध झालेल्या रामरक्षा स्तोत्राचा फायदा दुसर्‍या व्यक्तीला संकटातून सोडवण्यासाठी वापरला जाऊ शकतो. श्री राम रक्षा स्तोत्राचे पठण केल्याने साधक सर्व प्रकारचे अपघात, आकस्मिक संकट आणि इतर सर्व प्रकारच्या संकटांपासून सुरक्षित राहतो.
श्रीरामरक्षाच्या पठाणाने आत्मिक बल मिळते आणि मनःशांतीही लागते.
मातृशक्तीला आपल्या समाजात अनन्यसाधारण महत्त्व आहे. समाजाचे शुभ व्हावे समाजाला आत्मिक बल आणि मनशांती लाभावी म्हणूनच मातृशक्ती द्वारे एक लक्षवेळा श्री राम रक्षा पठणाचा कार्यक्रम एडवोकेट धनश्री देव श्रुती सेवा प्रकल्प आणि निलेश देव मित्र मंडळाने 22 जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता बिर्ला राम मंदिर, जाठरपेठ येथे आयोजित केला आहे. या भव्य उपक्रमात जास्तीत जास्त महिलांनी सहभागी होऊन समाजाला आत्मिक बल, सुख समृद्धी मिळावी यासाठी प्रार्थना करावी असे आवाहन आयोजक निलेश देव यांनी केले.. ज्यांना कार्यक्रमात सहभागी व्हायचे त्यांनी 9860122555 , 976-590-1122,
91 94059 02040, 91 83293 16212 , आपली नोंदणी करावी असे आआवाहन निलेश देव यांनी केलं आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!