अकोला दिव्य न्युज ब्युरो : सामाजिक व वैद्यकीय सेवा कार्यात सदैव सक्रिय श्रीमती बसंतीबाई चांडक रिलीफ फाऊंडेशन अकोला, अखिल भारतीय माहेश्वरी महासभा व माहेश्वरी समाज ट्रस्टच्या वतीने अकोला महानगरात ५ व्या माहेश्वरी लेखिका राष्ट्रीय साहित्य पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.अखिल भारतीय स्तरावर उल्लेखनीय साहित्य निर्माण करणाऱ्या माहेश्वरी समाजाच्या महिला लेखिकांना त्यांच्या साहित्य सेवेबद्दल दरवर्षी 1 लाख रुपये रोख आणि 100 ग्रॅम चांदीचे नाणे देऊन गौरविण्यात येते.
निवड समितीला संपूर्ण भारतातून अनेक प्रस्ताव येत असतात त्यातून एका लेखिकेची निवड केली जाते.यावेळी श्रीमती बसंतीबाई चांडक यांच्या स्मृतीत प्रख्यात महिला वक्त्यांचे व्याख्यानही आयोजित करण्यात येते. असा हा आगळावेगळा माहेश्वरी समाजातील महिला लेखिकेचा हा पुरस्कार सोहळा शनिवार दि 9 डिसेंबर रोजी दुपारी 4-30 वाजता माहेश्वरी भवन येथे आयोजित करण्यात आला आहे.
अ. भा. माहेश्वरी महासभेचे अध्यक्ष जोधपूर निवासी संदीप काबरा व सीए दामोदर सारडा यांच्या विशेष उपस्थितीत आयोजित या कार्यक्रमात कोलकाता निवासी श्रीमती ममता बिनानी वक्त्या म्हणून आपले व्याख्यान सादर करणार आहेत.माहेश्वरी समाज ट्रस्टचे अध्यक्ष विजय पनपालिया यांच्या उपस्थितीत आयोजित या कार्यक्रमात समाजातील महिला व पुरुषांनी उपस्थित राहण्याचे आवाहन श्रीमती बसंती चांडक रिलीफ फाउंडेशन ट्रस्टचे मुख्य विश्वस्त श्याम चांडक, साहित्य पुरस्कार समितीचे अध्यक्ष ब्रिजमोहन चितलांगे आदींनी केले.