अकोला दिव्य न्युज ब्युरो : अकोला रेल्वे स्थानकावरुन धावणाऱ्या ७ रेल्वे गाड्या येत्या ८ डिसेंबर ते १२ डिसेंबरपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. यामध्ये मुंबईला जाणारी हावडा-सीएसएमटी, मुंबई-हावडा साप्ताहिक एक्सप्रेस, ओखा-शालिमार एक्सप्रेस, शालिमार-ओखा एक्सप्रेस, हटिया-एलटीटी (मुंबई) एक्सप्रेस, एलटीटी (मुंबई)-हटिया एक्सप्रेस, मालदा टाउन सुरत एक्सप्रेससह इतर गाड्यांचा समावेश आहे.अशी माहिती मध्य रेल्वे उपभोक्ता सल्लागार समिती सदस्य नितीन खंडेलवाल यांनी दिली.
नागपूर विभागातील राजनांदगाव-कळमना रेल्वे विभागादरम्यान कन्हान स्थानकावर तिसरी लाईन टाकण्यासाठी दक्षिण पूर्व मध्य रेल्वेकडून नॉन इंटरलॉकिंग ब्लॉक घेण्यात येत आहे. या कामासाठी रेल्वे वाहतुकीवर परिणाम होणार आहे.
१२८७० हावडा-सीएसएमटी मुंबई साप्ताहिक एक्सप्रेस ८ डिसेबर रोजी रद्द राहील.
१२८६९ सीएसएमटी मुंबई-हावडा साप्ताहिक एक्सप्रेस १० डिसेबर रोजी रद्द राहील.
२२९०५ ओखा-शालिमार एक्सप्रेस १० डिसेंबररोजी रद्द राहील.
२२९०६ शालिमार-ओखा एक्सप्रेस १२ डिसेंबररोजी रद्द राहील.
१२८१२ हटिया-एलटीटी (मुंबई) एक्सप्रेस ८ व ९ डिसेंबरला रद्द राहील.
१२८११ एलटीटी (मुंबई)-हटिया एक्सप्रेस १० व ११ डिसेंबररोजी रद्द राहील.
१३४२५ मालदा टाउन सुरत एक्सप्रेस २ व ९ डिसेंबलरोजी रद्द राहील.
१३४२६ सुरत-मालदा टाउन एक्सप्रेस ४ व ११ डिसेंबरला रद्द राहील.
१२१०१ एलटीटी(मुंबई)-शालिमार एक्सप्रेस ८,९, ११ आणि १२ डिसेंबरला रद्द राहील.
१२१०२ शालीमार-एलटीटी (मुंबई) एक्सप्रेस १०, ११, १३ व १४ डिसेंबरला रद्द राहील.
२०८२३ पुरी – अजमेर ट्रेन सेवा ४,७ आणि ११ डिसेंबरला रद्द राहील.
२०८२४ अजमेर-पुरी ट्रेन सेवा ७,१२ आणि १४ डिसेंबरला रद्द राहील.
२०८२२ संत्रागाची-पुणे हमसफर एक्सप्रेस ९ डिसेंबरला रद्द राहील.
२०८२१ पुणे – संत्रागाची हमसफर एक्सप्रेस ११ डिसेंबर रोजी रद्द राहील.