अकोला दिव्य न्युज ब्युरो : पोलिस खात्यात असून, मोठ्या अधिकाऱ्यांशी संबध आहेत. असे सांगुन गावातील ओळखीच्या तिघांना पोलिस दलात आणि सैन्यात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून सुमारे ५३ लाख रूपयांनी तिघा जणांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांच्या आदेशानुसार या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
बाळापूर तालुक्यातील एका गावातील तक्रारीनुसार ते होमगार्ड म्हणून काम करीत होते. त्यांच्याच गावातील आरोपीने त्यांना महाराष्ट्र पोलीस खात्यात सहायक पोलीस उपनिरीक्षक पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून नियुक्तीची खोटी कागदपत्रे खरे असल्याचे भासवून नोकरी करीता वारंवार नगदी व ऑनलाइनद्वारे एकूण १८ लाख रूपये घेतले. दरम्यान त्याने गावातील एका तक्रारदाराच्या मुलीला पोलिस खात्यात सहायक पोलीस उपनिरीक्षक या पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडूनही २० लाख ४२ हजार रूपये घेऊन फसवणूक केली. तसेच आणखी एकाच्या तक्रारीनुसार एका युवकास आर्मीमध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून त्याच्याकडून एकूण १५ लाख रुपये घेवून फसवणूक केली.
तिघांनीही याबाबत पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांच्याकडे तक्रार केली होती. या तक्रारीनुसार चौकशी करून चौकशी अहवाल तयार करून पोलिस अधीक्षकांनी आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार उरळ पोलिसांनी आरोपीविरूद्ध भादंवि कलम ४२०, ४६५, ४६८, ४७१ नुसार गुन्हा दाखल केला.
५३ रूपयांनी फसवणूक केल्या प्रकरणात तक्रार आल्यानंतर पोलिस अधीक्षकांच्या आदेशानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीचा शोध घेण्यात येत आहे. लवकरच आरोपीला गजाआड करण्यात येईल.असे उरळ पोलिस ठाण्याचे निरीक्षक
गोपाल ढाेले यांनी सांगितले.